खटाव:-देविदेवतांचे चित्रे असणारे फटाक्यांची विक्री थांबवा-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने निवेदन.
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9921778417

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
देविदेवतांचे चित्रे असणारे फटाक्यांची विक्री थांबवा.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खटाव तालुक्याचा वतीने तहसिलदारांना व उपविभागीय पोलिस अधीक्षक वडूज यांना निवेदन.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने दिनांक १३ ऑक्टोंबर २०२२ रोजी वडूज येतील तहसीलदार साहेब व उपविभागीय पोलिस अधीक्षक वडूज यांना फटाक्यांचा माध्यमातून होत असणारे देव देवतांचे विटंबन थांबावे म्हणून निवेदन देण्यात आले. दिवाळी मध्ये वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या आवरणावर हिंदू धर्मातील देवतांचे चित्रे असतात. फटाके वाजल्यानंतर त्या चित्राच्या चिंध्या होऊन एक प्रकारे हिंदू धर्मातील पूजनीय देवतांचा अपमान होत आहे.तरी याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन आशा प्रकारच्या फटाक्यांची विक्री होऊ देऊ नये असे निवेदन *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खटाव* तालुक्या च्या वतिने देण्यात आले.