क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा जिल्हा:-देश विघातक प्रवृत्ती समूळ नामषेश झालीच पाहिजे.

प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9921778417

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

देश विघातक प्रवृत्ती समूळ नामषेश झालीच पाहिजे.

वडुज

दिनांक १८ ऑक्टोंबर २०२२ रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात, हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. PFI ह्या संघटनेवर केंद्र सरकार कडुन बंदि घालण्यात आली असून देखील काही दहशतवादी कृत्य करणारे लोक त्या संघटनेमार्फत काम करत आहेत, असे निदर्शनास आले आहे, तरी त्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निवेदन देण्यात आले आहे, यावेळी बोलताना धारकरी म्हणाले PFI या संघटनेवर बंदी घातली असताना सुद्धा सातारा जिल्ह्यात त्याचे काम चालू असल्याचे दिसून येत आहे, दुर्गा माता दौडच्या वेळी पाकिस्तान विरोधी व अफझलखान विरोधी घोषणा दिल्यानंतर यांच्या भावना दुखावल्या जात असतील तर हे देश द्रोहीच आहेत,जे आमचे शत्रू आहेत त्यांच्या विरोधात आम्ही आवाज उठवणारच, ज्यांना पाकिस्तानचा पुळका येतो आहे ते सर्व PFI संघटनेशी संबंधित आहेत असे दिसत आहे, तरी त्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रम पावसकर हे हिंदूत्वाचे विचार मांडत आहेत, अफझलखानाचे नाव घेतल्यावर व ज्यांना पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्यानंतर राग येतोय, त्यांनीच विक्रम पावसकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, परंतु विक्रम पावसकर यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर खबरदार असा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खटाव तालुकाच्या वतीने देण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला *_हिंदु एकता आंदोलन,भगवे वादळ ग्रुप ,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , समस्त हिंदू बांधव_* यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button