फलटण :-जाचहाट , आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस ७ वर्ष शिक्षा.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण:-7972521412

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
जाचहाट , आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस ७ वर्ष शिक्षा
प्रतिनिधी शुभम भापकर
जिंती ता . फलटण येथे दि . ०७/०८/२०१८ ते दि . २८/१०/२०१८ या दरम्यान आरोपो रोहीत भास्कर घाडगे ( मयताचे पती ) वय २३ वर्ष, अमित भास्कर घाडगे ( मयताचे दीर ) वय २० वर्ष दोघे रा . जिती ता . फलटण विद्या प्रकाश भोसले ( मयताची नणंद ) ४१ वर्ष रा . निबळक ता . फलटण जि . सातारा यांनी मयत सौ दिपाली रोहीत घाडगे हीचा छोट्या छोट्या कारनावरून शारीरीक व मानसिक छळ केला व तिच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिला वेळोवेळी शिवीगाळ , दमदाटी करून तिला उपाशीपोटी ठेवून मारहान करुन वरचेवर तिला घरात कोडून ठेवले तसेच आरोपी नं ३ मयताची नणंद ) हीचे सांगनेवरून आरोपीने नं १ याने मयतेस टोचून बोलून मानसिक त्रास देवून तिला आत्महत्तेस प्रवृत्त केल्याची तक्रार श्रीनाथ संपत माने ( मयताचे ( भाऊ ) वय २१ वर्ष रा पिपळवाडी ( साखरवाडी ) ता फलटण जि सातारा यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केली होती सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन सहा . पो . निरीक्षक नागटिळक यांनी करुन मा न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आले होते . सरकारतर्फे श्री मिलींद ओक सहा जिल्हा सरकारी वकील सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहीले नमुद केसमध्ये एकुण ०२ साक्षीदार तपासणेत आले . केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांचे साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राहय मानुन मा . न्यायाधीश यांनी आरोपी रोहीत भास्कर घाडगे यास भा.द.वि.स.क .४ ९ ८ ( अ ) अन्वये २ वर्ष कारावास व रुपये ५,००० / – दंड , दंड न दिलेस १५ दिवस साधी कैद व भा.द.वि.स.क .३०६ अन्वये ७ वर्ष सक्त मजुरी व रुपये २०,००० / – दंड , दंड न दिलेस ३ महीने साथी कैद अशी शिक्षा दिली आहे .