ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-भाजपा संघटनेला प्रशासकीय बळ; ‘सेवा अभियान’च्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना गती.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-भाजपा संघटनेला प्रशासकीय बळ; ‘सेवा अभियान’च्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना गती.

नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी थेट प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा; जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

सातारा :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी ‘सेवा अभियान’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार व भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथे या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्रशासकीय पातळीवर योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी या माध्यमातून महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला.
या अभियानाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोषजी साखरे यांनी सातारा येथे उपस्थित राहून नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विविध शासकीय कामांसंदर्भातील निवेदने स्वीकारली. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्या, प्रलंबित प्रकरणे तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये अडकलेल्या कामांची सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली.
ज्या प्रकरणांमध्ये तातडीने प्रशासकीय हस्तक्षेप आवश्यक आहे, अशा विषयांबाबत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नियमांच्या चौकटीत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या योग्य पातळीवर मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
विशेष म्हणजे, केवळ स्थानिक पातळीवरील प्रश्नांपुरते हे अभियान मर्यादित न ठेवता शासनस्तरावर निर्णय आवश्यक असलेल्या प्रकरणांसाठीही प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार आहे. अशा निवेदनांना प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांचे कव्हरिंग लेटर जोडून संबंधित मंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय तसेच आवश्यक त्या शासकीय विभागांकडे प्रस्ताव व निवेदने पाठविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
यामुळे नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना योग्य प्रशासकीय तसेच शासनस्तरीय व्यासपीठ मिळणार आहे.
“भारतीय जनता पार्टी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित संघटना नसून, सामान्य माणसाच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभी राहणारी संघटना आहे,” हा संदेश ‘सेवा अभियान’च्या माध्यमातून अधोरेखित होत आहे. नागरिकांच्या समस्या संबंधित शासकीय यंत्रणेकडे पोहोचवून त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची ही कार्यपद्धती निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
‘सेवा अभियान’च्या माध्यमातून भाजपा संघटनेला प्रशासकीय बळ मिळत असून, नागरिकांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची नवी कार्यसंस्कृती निर्माण होत आहे.
सातारा येथे पार पडलेल्या या उपक्रमाचे नागरिक, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. आपल्या प्रलंबित प्रश्नांसाठी थेट मार्गदर्शन आणि पाठपुरावा मिळत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार धैर्यशील दादा कदम, पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रमजी पावसकर, सुनील काटकर तात्या, प्रशांतजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकासजी गोसावी, विठ्ठल बलशेठवार, मनीषाताई पांडे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत भोसले, सोशल मीडिया प्रदेश सदस्य रविंद्र लाहोटी, स्वप्नील पाटील, राहुल शिवनामे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button