सातारा :-शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात बैठक संपन्न.
प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव -9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात बैठक संपन्न.
सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी मा.युवराज नाईक सर यांनी केले क्रीडा संघटनांना मार्गदर्शन.काल सोमवार दि.19 सप्टेंबर रोजी शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी जिल्हा स्तर क्रीडा स्पर्धा नियोजनाच्या संदर्भात बैठक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा येथे सातारा जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मा युवराज नाईक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यावेळी क्रीडा कार्यालयाचे तालुका क्रीडाधिकारी मा.हितेंद्र खरात सर,क्रीडा मार्गदर्शक खुटाळे सर,क्रीडाधिकारी अतनूर सर,जेष्ठ क्रीडा शिक्षक काटकर सर,क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश काळे सर,क्रीडा संघटक वीरभद्र कावडे सर,गफार पठाण सर,श्रीमंत कोकरे सर राजेंद्र पवार सर जयवंत गोडसे सर अनिल निकाळजे सर आणि विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शालेय जिल्हा आणि विभाग स्पर्धा आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.