पुणे:-मल्टी जिनियसच्या “कोंढवा” शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.
प्रतिनिधी रफिक शेख पुणे:-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मल्टी जिनियसच्या “कोंढवा” शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.
पुणे दि. 27 (रफिक शेख ) :- पुणे येथील मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. कंपनीचा कोंढवा शाखेचा उद्घाटन सोहळा मा. नजीर तांबोळी आणि परवीज निदा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी तांबोळी इंजिनिअरिंगचे MD तांबोळी सर आणि मोलेदिना हायस्कूलच्या मुख्याध्यापिका परवीज निदा मॅडम यांनी मल्टी जिनियस विषयी आपले मोलाचे मत व्यक्त करत संस्थापक-अध्यक्ष फिरोज शेख यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. फिरोज शेख हे मेकॅनिकल इंजिनीअर, MBA आणि ISO ऑडिटर आहेत. त्यांना भारत आणि परदेशात 24 वर्षांचा कामाचा अनुभव आहे, त्यानी हिताची मध्ये क्वालिटी मॅनेजर आणि सेंदान (कोरियन कंपनी) मध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम केले आहे.
आपल्या देशातील लोकांना मार्गदर्शन करणे व नोकरी देणे हा विचार करून परदेशातील शाश्वत नोकरी सोडली व भारतात येवून 11 नोव्हेंबर 2019 रोजी जिनियस प्रोफेशनल्स ही संस्था सुरू केली. 2 वर्षातील यशस्वी कामगिरीनंतर व्यवसायाचा विस्तार केला आणि मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. ही कंपनी 11 नोव्हेंबर 2021 रोजी खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू केली.
या कंपनीने गेल्या पावणे तीन वर्षांत विविध पदांसाठी 240 हून अधिक लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत आणि 130 कंपन्यांशी करार केला आहे. ते विविध शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात करिअर मार्गदर्शन करतात.
मल्टी जिनियस ही कंपनी अतिशय व्यावसायिक पद्धतीने विविध प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेवा प्रदान करते. तसेच मुलाखतीसाठी पाठवण्यापूर्वी फ्रेशर्स तसेच अनुभवी लोकांसाठी करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन करते. म्हणूनच यांच्या सेवा परिणामाभिमुख आहेत आणि ते या कंपनीने सिद्ध केले आहे. गेल्या काही वर्षात भारतातील नोकरी देणारी विश्वसनीय संस्था म्हणून प्रचलित आहे. व्यवस्थापक, अभियंता, वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचारी, कुशल कामगार इत्यादी जवळपास सर्व पदांसाठी भरपूर नोकऱ्या येथे उपलब्ध असतात.
मल्टी जिनियसचे मुख्य कार्यालय पुण्यातील कात्रज येथे असून कोंढवा(पुणे) व कोल्हापूर येथे शाखा आहेत. लवकरच संपूर्ण भारत आणि इतर देशांमधील विविध शहरांमध्ये अधिक शाखा सुरू करण्याचे या कंपनीचे MD फिरोज शेख यांनी सांगितले.
Great work, best wishes every time
Thanks 🙏
Great work, news is perfect, good wishes
Thanku so much sir