आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-‘गुप्त राजकीय समझोता?’ वाईत भाजप-राष्ट्रवादीत गुपचूप सलोखा; बाबरांच्या सत्काराने चर्चांना उधाण!.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) ‘गुप्त राजकीय समझोता?’ वाईत भाजप-राष्ट्रवादीत गुपचूप सलोखा; बाबरांच्या सत्काराने चर्चांना उधाण!.

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

वाई दि. १९ : वाई पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर यांनी विजयी उमेदवारांचा केलेला सत्कार अनेक प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे.
अजित पवार गटाचे पै. विक्रांत डोंगरे (सभापती) आणि वर्षा जगताप (उपसभापती) यांच्या विजयानंतर बाबर यांनी प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. मात्र, या ‘सौजन्य भेटी’मागे काही वेगळेच राजकीय गणित तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
निवडीच्या दिवशी भाजपच्या डॉ. सुरभी भोसले यांनी “मतदान गुप्त पद्धतीने झाले असते, तर निकाल वेगळा लागला असता,” असे वक्तव्य करत अप्रत्यक्ष संकेत दिले होते. राष्ट्रवादीचे सदस्य संपर्कात होते का, या प्रश्नावर त्यांनी दिलेले सूचक उत्तर आता अधिकच महत्त्वाचे ठरत आहे.
विशेष म्हणजे, दिलीप बाबर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्षपद भूषवले असून, नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या या हालचालीमुळे ‘इनसाइड पॉलिटिक्स’ची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
बाबर समर्थक मात्र ही केवळ औपचारिक भेट असल्याचे सांगत असले, तरी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावर वाईतील बदलती राजकीय समीकरणे कोणाला फायदेशीर ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2) वाई:-‘रुग्णसेवेचा नवा आधारवड!’ अश्विना डायलिसिस सेंटरमुळे वाईत उपचारांना दिलासा; ननावरे यांचा विश्वास.

वाई दि. १९ : वाई शहरात सुरू झालेल्या ‘अश्विना डायलिसिस सेंटर’मुळे डायलिसिस रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, हे केंद्र रुग्णसेवेत आघाडीवर राहील, असा विश्वास वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे यांनी व्यक्त केला.
‘अश्विना डायलिसिस सेंटर’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. “सामाजिक भावनेतून सुरू केलेले उपक्रम दीर्घकाळ टिकतात. डॉ. महेश मेणबुदले यांनी ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद केवळ जपले नाही, तर ते कृतीत उतरवले आहे. स्पंदन हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी उभारलेला लौकिक आता या सेंटरमुळे अधिक वृद्धिंगत होईल,” असे ननावरे म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव शिवाचार्य महाराज वाईकर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ. मेणबुदले यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, “दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. माणुसकीचा धर्म जपत कार्य करणारेच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतात,” असे मत व्यक्त केले.
यावेळी सेंटरचे संचालक डॉ. महेश मेणबुदले यांनी सांगितले की, “डायलिसिस उपचारांचा वाढता खर्च अनेक रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे अत्यंत माफक दरात दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने हे सेंटर सुरू केले आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.”
या उद्घाटन सोहळ्यास पत्रकार विकास जाधव, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. रूपाली पवार, डॉ. स्नेहल शिंगटे, डॉ. नाज मकानदार, डॉ. आकांक्षा गायकवाड, श्रीकांत वालेकर, सोमनाथ आप्पा राऊत, विशाल गाडे यांच्यासह वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button