वाई येथे ट्रॅक्टरचा अपघात; ४ स्कूटी व जीपचे नुकसान.
पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई येथे ट्रॅक्टरचा अपघात; ४ स्कूटी व जीपचे नुकसान.

सातारा प्रतिनिधी अनिल वाडकर
वाई (प्रतिनिधी): शहरातील धुडीविनायक परिसरात आज अचानक घडलेल्या अपघातात एका ट्रॅक्टरने नियंत्रण सुटल्याने पुढे उभ्या असलेल्या चार स्कूटी आणि एका जीपला जोरदार धडक दिली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चार स्कूटींचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॅक्टर उतारावरून जात असताना अचानक ब्रेक लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. चालकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला आणि ट्रॅक्टर थेट पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांवर जाऊन आदळला.
या अपघातात ट्रॅक्टर चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, नागरिकांनी वाहने पार्क करताना तसेच उताराच्या रस्त्यांवर अधिक दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




