कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजंठा:-फुलोऱ्यात आलेल्या एकरभर मका पिकाची नासाडी. नाटवी शिवारात वन्यप्राण्यांचा उपद्रव  शेतकऱ्यांचे नुकसान.

प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401.

फुलोऱ्यात आलेल्या एकरभर मका पिकाची नासाडी.
नाटवी शिवारात वन्यप्राण्यांचा उपद्रव  शेतकऱ्यांचे नुकसान.

वन्यप्राण्यांच्या उपद्रवात सिल्लोड तालुक्यातील नाटवी
शिवारातील एका शेतातील फुलोऱ्यात आलेल्या एकरभ र मका पिकाची नासाडी झाली.बँकेकडून कर्ज घेऊन त्या शेतकऱ्याने यंदा मका व कपाशीची लागवड केली होती.तोंडचा घास गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.महसूल व वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुनील कालभिले यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचेकडे केली आहे.
अजिंठा डोंगररांगेच्या पायथ्याशी असलेल्या नाटवी शिवारात(गट क्र.१९६)मादणी येथील चांगदेव पुंजाजी काळे यांची अडीच एकर शेतजमीन आहे.त्यात दीड एक रात कपाशी व एक एकर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली होती.मक्याचे पीक फुलोऱ्यात असतांना वन्यप्रा ण्यांनी ताव मारत तब्बल एकरभर क्षेत्राची नासधूस केली.शेतात गेल्यानंतर हा प्रकार पाहून काळे यांच्या पायाखालची जमीन सरकली.खरीपाचा माल हातून गेल्याने काळे यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून त्यांनी पन्नास हजाराचे कर्ज घेतले आहे.
………..
मादनी येथील संजय सुखदेव बदर यांचीही नाटवी शिवार गट क्रमांक १९६ मधील एक एकर क्षेत्रातील अर्धा एकर मक्का जंगली प्राण्यांनी नासधूस केली आहे.त्यांच्यावरही
बँकेचे कर्ज आहे.
….
अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आमसरी,
वाघेरा,नाटवी व वडाळीच्या शेतकऱ्यांना दरवर्षी या संकटाशी सामना करावा लागतो.नुकसानीची भरपाई मिळावी यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया किचकट आहे.
या जंगलाभोवती तारेचे कुंपण करावे अशी गेली अनेक वर्षाची मागणी शेतकऱ्यांची आहे.
…………..
यासंदर्भात तलाठी यांना तात्काळ पंचनामे करून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना कृषी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत.
……

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button