निगडी:-ज्ञानदीप प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी जल्लोषात साजरी.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी :-9767275783.
ज्ञानदीप प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी जल्लोषात साजरी.
पुणे, निगडी, दि. 19 (शफिक शेख):- श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून रूपीनगर येथे ज्ञानदीप प्राथमिक शाळेमध्ये 1ली 5 वीच्या विद्यार्थ्यांनी मोठया जल्लोषामध्ये दही हंडी च्या कार्यक्रमासह आनंदाने गोकुळाष्टमी साजरी केली.
यावेळी छोटया – छोटया बालगोपाळांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करीत आनंदाने दही हंडी फोडण्याचा आनदं साजरा केला.
मुले लहान असल्याने शिक्षकांची, शिक्षकेतर सेवकांची आणि मुख्यतः मुख्याध्यापकांची यावेळी कसोटी लागली. तरीही आपली जबाबदारी पूर्ण ताकदीनिशी पार पाडीत सदर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम कोणताही अनुचित किंवा दुखापतीचा प्रसंग न ओढवता साजरा करण्यात आला. सर्व शिक्षकगण, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर सेवक व सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.