ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव:-विखे कारखान्याच्या सहकारी पतपेढी अध्यक्षपदी प्रमोद राहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र म्हसे यांची बिनविरोध निवड !
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी :-कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042.
लोहगाव ( वार्ताहर )पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना नोकर लोकांची सहकारी पतपेढीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी प्रमोद दत्तात्रय राहणे, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र सुखदेव म्हसे यांची बिनविरोध निवड आली आहे.
प्रवरानगर येथील आशिया खंडातील पहिल्या पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 ते 2027 पर्यंत उपनिबंधक कार्यालय राहता यांच्याकडून निवडणूक कार्यक्रमानूसार अकरा संचालक बिनविरोध निवडून आले. या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष पदासाठी प्रमोद राहणे, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र म्हसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी संस्थेचे मॅनेजर भाऊसाहेब पानसरे यांनी काम पाहिले. यावेळी संचालक प्रवीण भणगे, जयवंत कडू, बाबासाहेब दिघे, लक्ष्मण व्यवहारे, नवनीत साबळे, महिला संचालक लीला संजय घोरपडे, दिपाली किरण आहेर, तुकाराम ताजणे, सोन्याबापु दातीर उपस्थित होते.
या संस्थेची स्थापनेपासून आज पर्यंत बिनविरोध निवडणूक होण्याची परंपरा कायम राखली आहे. या संस्थेचे आधारस्तंभ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के असून त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम करभार करून संस्था अधिक प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया नूतन अध्यक्ष प्रमोद राहाणे यांनी दिली.
नुतन पदाधिकाऱ्यांचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉ सुजय दादा विखे पाटील, शालिनी विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे सल्लागार जिमी ओल्सन, उपाध्यक्ष विश्वासराव कडू, कामगार संचालक पोपटराव वाणी, दिलीपराव कडू, कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, कार्यकारी संचालक ए. के. भागडे तसेच कारखान्याचे संचालक, पतसंस्थेचे संचालक, सभासद, कामगार यांनी अभिनंदन केले. (सर फोटोसह कृपया बातमी घ्यावी ही नम्र विनंती)