मोलेदिना हायस्कूलचे ध्वजारोहण Adv. मरजबान इराणी यांच्या हस्ते संपन्न.
प्रतिनिधी रफिक शेख पुणे :-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483
मोलेदिना हायस्कूलचे ध्वजारोहण अॅड. मरजबान इराणी यांच्या हस्ते संपन्न.
कात्रज, दि.18 (रफिक शेख ) :- 75 अमृत महोत्सवानिमित्त मोलेदिना हायस्कूल अँड ज्युनियर काॅलेजमध्ये ध्वजारोहण अॅड. मरजबान के. इराणी, पुणे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट व मुंबई हायकोर्ट यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी लहान मुला मुलींनी देशभक्तीचे गित गायले, वेगवेगळ्या वेशभूषा करुन मुला मुलींनी मनोरंजन केले. शिवाय निबंध स्पर्धा, बोलके म्युझिकल रेखाचित्र आणि व्हिडिओ बनवण्याचे काम विद्यार्थ्यांनी तब्बल एक महिनाभर मेहनत करुन बनवले आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे अॅड. इराणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सांगीतले की आयुष्यात काही मोठे पद आणि चांगले बनण्यासाठी उच्च आणि चांगले शिक्षण घेतले पाहिजे. कष्ठ करण्यासाठी लाज बाळगू नका, धाडसी बना, जीवनात काही बनायचे असेल तर जिदृद आणि चिकाटी ठेवा यश आपोआपच तुमच्या मागे येईल असा मोलाचा सल्ला दिला.
या कार्यक्रमात मोलेदिना हायस्कूलचे चेअरमन रियाज ओमर सर, सुपरवायझर समीर पठाण सर, आणि मोलेदिना स्कूलच्या प्रिन्सिपल सय्यद शाह परवीज निदा तसेच पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मोलेदिना हायस्कूल मधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शाळेत चांगल्या प्रकारे डेकोरेशन केले होते.