ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसंग्राम चे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन.

संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

दि :-14/08/2022

संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

शिवसंग्राम चे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन.

आज सकाळी सकाळी महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण  अपघात होऊन त्यांचे निधन झाले आहे. आज ते बैठकीसाठी मुंबईला येत होते. त्यावेळेस मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये विनायक मेटेंना गंभीर जखमी अवस्थेत कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. आज दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी बीडहून मुंबईला येत होते.मराठा समाजासाठी आपले अफाट काम करणारे, अगदी सामान्य परिस्थितीतून येऊन राज्याच्या राजकारणात आपल्या नावाची दखल घेण्यास लावणारे, विधानपरिषदेमध्ये सतत राज्यातील विविध प्रश्न मांडणारे मा. विनायक मेटे यांचे अपघाती निधन मनाला दुःख देणारे आहे. भावपूर्ण श्रध्दांजली… 💐💐🙏🙏🙏.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button