आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-‘ज्ञान माऊली’च्या अभंगवाणीने वाई भक्तिरसात न्हाऊन निघाले!

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-‘ज्ञान माऊली’च्या अभंगवाणीने वाई भक्तिरसात न्हाऊन निघाले!

संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर; नाटिका, हरिपाठ आणि अभंगवाणीने रंगला भक्तिमय सांस्कृतिक सोहळा
वाई | दि. ९ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्य, विचार आणि भक्तिपरंपरेचा जागर घडविणारा ‘ज्ञान माऊली’ हा भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम सत्यवती जोशी सभागृह, वाई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन सौ. प्रीती कोल्हापुरे यांच्या प्रयत्नातून, तसेच जीवन विद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र, वाई यांच्या सहकार्याने करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानसाधना केंद्राच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भक्तिमय हरिपाठाने झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नामस्मरणाने सभागृहातील वातावरण भक्तिरसाने भारून गेले. त्यानंतर व्हिजन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या नाटिकेने संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रसंग प्रभावीपणे उभे करत उपस्थितांची दाद मिळवली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पाठविलेल्या संदेशपत्राचे वाचन सौ. सुलभा लोखंडे यांनी केले. यावेळी सौ. कमल पोफळे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर विचार मांडताना त्यांच्या साहित्याची आणि समतेचा, अध्यात्माचा व मानवतेचा संदेश देणाऱ्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली.
कार्यक्रमाचा संगीताचा भाग श्री. सतीश जेधे आणि सौ. मोरे ताई यांच्या सुमधुर *‘अभंगवाणी’*ने अधिकच रंगला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग सुरेल स्वरांत सादर होताच रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. अभंगांच्या स्वरांनी संपूर्ण सभागृहात भक्ती, अध्यात्म आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमास वाईचे नगराध्यक्ष श्री. अनिल सावंत, उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, व्हिजन स्कूलच्या मुख्याध्यापिका राव मॅडम, प्रबोधक श्री. नानासाहेब जेधे देशमुख, श्री. अशोक देव, श्री. सतीश पानसे, सौ. गीता तांबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी, कार्यकर्ते आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रीती कोल्हापुरे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे कौतुक करण्यात आले. समारोपप्रसंगी जीवन विद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र, वाईच्या अध्यक्षा सौ. स्वाती मांढरे यांनी उपस्थित मान्यवर, कलाकार, विद्यार्थी, कार्यकर्ते आणि रसिक श्रोत्यांचे आभार मानले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांचा गजर, विचारांचा जागर आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराची सुंदर सांगड घालत ‘ज्ञान माऊली’ कार्यक्रमाने वाईकरांना भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा अनुभव दिला. उत्स्फूर्त प्रतिसादात हा सांस्कृतिक सोहळा संस्मरणीय ठरला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button