त्र्यंबकेश्वर:-धावता धावता १२ ज्योतिलिंगाची यात्रा ! बिहारचा मोनु बेटुरवाला त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होणार…..
पत्रकार संजय पगारे

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

त्र्यंबकेश्वर:-धावता धावता १२ ज्योतिलिंगाची यात्रा ! बिहारचा मोनु बेटुरवाला त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होणार…..

त्र्यंबकेश्वर ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा बिहारचा मोनू बेटुरवाला त्रिंबकेश्वर मध्ये दाखल भारतातील १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक विविध माध्यमातून प्रवास करताना आपण पहिले आहेत मात्र बिहार मधील तरुण मोनू बेतुरवाला यांचा प्रवास काहीसा वेगळाच आहे त्यांनी चक्क रनिंग करत १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा संकल्प केला आहे गेल्या पाच महिन्यापासून घरापासून दूर असलेले मोनू आतापर्यंत तब्बल ८ राज्यांचा प्रवास करत चार ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण केलेअसून आता त्यांच्या या अध्यात्मिक रनिंग यात्रेचा पुढील टप्पा नाशिकच्या श्री त्रिंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा आहे सायकल वरून पायी किंवा विविध साधनांनी धार्मिक यात्रा करणारे अनेक जण आपण पाहिले आहेत मात्र धावण्याच्या माध्यमातून देशातील १२ ज्योतिर्लिंगाना जोडण्याचा मोनू यांचा हा अनोखा प्रयन्न निश्चतच लक्षवेधी ठरत आहे
शारीरिक कष्ट श्रद्धा आणि दृढ संकल्पच्या जोरावर सुरू असलेली ही धाव आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीत पोचला आहे.




