छत्रपती संभाजीनगर:- यशवंत सेनेच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिपक जगताप यांची नियुक्ती.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

छत्रपती संभाजीनगर:- यशवंत सेनेच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिपक जगताप यांची नियुक्ती.

छत्रपती संभाजीनगर
यशवंत सेनेच्या संघटनात्मक विस्ताराला वेग देत श्री. दिपक तात्यासाहेब जगताप यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी देण्यात आले आहे.
यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी राज्य मंत्री मा. श्री. बाळासाहेब दोडतले साहेब यांच्या आदेशानुसार दिपक जगताप यांची ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
यशवंत सेनेच्या ध्येय-धोरणानुसार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्याची जबाबदारी आता दिपक जगताप यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. “सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन एकनिष्ठपणे पक्षासोबत राहून पक्षबंधणी करावी व पक्ष मजबूत करावा,” अशी अपेक्षा नियुक्तीपत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात यशवंत सेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासोबतच तळागाळातील कार्यकर्त्यांना जोडणे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि संघटनेचे विचार ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिपक जगताप यांच्यावर राहणार आहे.
या नियुक्तीबद्दल यशवंत सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून दिपक जगताप यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
नव्या जबाबदारीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात यशवंत सेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.
“नवी जबाबदारी, नवा संकल्प; ग्रामीण भागात यशवंत सेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार!”




