मायणी:-आमदार सुहास बाबर यांनी मायणी येथील तारळेकर परिवारास भेट देऊन केले सांत्वन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी:-आमदार सुहास बाबर यांनी मायणी येथील तारळेकर परिवारास भेट देऊन केले सांत्वन.

मायणी प्रतिनिधी——(फोटो – आमदार सुहास बाबर यांचे स्वागत करताना सुजित तारळेकर व इतर)
मुंबई पोलिस सुजित तारळेकर यांचे वडील स्व.एकनाथ तारळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त खानापूर – आटपाडी मतदार संघाचे आमदार सुहास बाबर यांनी भेट देऊन त्यांनी तारळेकर परिवाराचे सांत्वन केले. तसेच स्व.एकनाथ तारळेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. अनंतराव तारळेकर यांनी आमदारांना तारळेकर परिवाराची माहिती दिली. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. सुरज पाटील यांनीही भेट देऊन स्व.एकनाथ तारळेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी पत्रकार पांडुरंग तारळेकर,पत्रकार तानाजी चव्हाण,अजित तारळेकर,आदिनाथ तारळेकर,रामकृष्ण तारळेकर,वामन तारळेकर, दिलीप तारळेकर,सचिन तारळेकर, कृष्णा सोमदे,गंगाराम सुगदरे,राहुल बाबर,गणेश लंगडे,देवांग समाजाचे अध्यक्ष विजयराव कवडे,विजय वरुडे,चंदन वरुडे,नितीन वरुडे,अरुण चोथे,अशोक म्हेत्रे,आनंदराव शेवाळे आदि उपस्थित होते. – –




