आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजाचे कुर्ले:-(पुसेसावळी)-मा.गटशिक्षणाधिकारी संगीता गायकवाड यांच्या उपस्थितीत कळंबी केंद्रसमूहाची शिक्षण परिषद; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ‘रद्दीतून ग्रंथालय’ उपक्रमाचे उद्घाटन.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208718483

  राजाचे कुर्ले:-(पुसेसावळी)-मा.गटशिक्षणाधिकारी संगीता गायकवाड यांच्या उपस्थितीत कळंबी केंद्रसमूहाची शिक्षण परिषद; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ‘रद्दीतून ग्रंथालय’ उपक्रमाचे उद्घाटन.

खटाव :- पंचायत समिती खटावच्या मा. गटशिक्षणाधिकारी श्रीमती संगीता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबी केंद्रसमूहाची शिक्षण परिषद राजाचे कुर्ले येथील श्री गिरिजाशंकर विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.यावेळी शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेत पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘रद्दीतून ग्रंथालय’ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन मा. गटशिक्षणाधिकारी श्रीमती संगीता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी केंद्रप्रमुख श्री. धनाजी पवारसाहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय माने, शाळेचे मुख्याध्यापक श्री. गुरव सर, शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री. जाधव सर तसेच केंद्रसमूहातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेत यश संपादन करून विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची व केंद्रसमूहाची मान उंचावल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत व जिद्दीच्या बळावर अधिक यश संपादन करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
शिक्षण परिषदेच्या विषयपत्रिकेनुसार नियमित बाबींचा आढावा, केंद्रसमूहातील शिक्षकांचे विचार व अनुभव देवाणघेवाण, अध्ययन निष्पत्ती व आशयाधारित मासिक नियोजन, पी.एम. व विद्या व्हिडिओ निर्मिती, नवोपक्रम, गुणवत्ता आधारित स्पर्धा परीक्षा तसेच डॉ. जयंत नारळीकर गणित-विज्ञान उपक्रम आदी विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
या शिक्षण परिषदेचे विशेष आकर्षण ठरलेल्या ‘रद्दीतून ग्रंथालय’ उपक्रमात टाकाऊ व रद्दीतील उपयुक्त साहित्याचा कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यास मदत होणार असून उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध शैक्षणिक उपक्रमांवरील चर्चा आणि मा. गटशिक्षणाधिकारी श्रीमती संगीता गायकवाड यांच्या हस्ते ‘रद्दीतून ग्रंथालय’ उपक्रमाचे उद्घाटन यामुळे कळंबी केंद्रसमूहाची शिक्षण परिषद उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button