आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहिल्यानगर:-“मनसेच्या दणक्याने RTO ऍक्शन मोडमध्ये! – अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय वाहनांवरील काळ्या काचा काढण्याचे आदेश”.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष,

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) अहिल्यानगर:-“मनसेच्या दणक्याने RTO ऍक्शन मोडमध्ये! – अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय वाहनांवरील काळ्या काचा काढण्याचे आदेश”.

अहमदनगर (राजकुमार इकडे)

सामान्य जनतेला नियम शिकवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीच नियमबाह्य पद्धतीने काळ्या काचा लावलेल्या वाहनांचा वापर सुरू केला होता. ही बाब *महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पारनेर चे तालुका अध्यक्ष श्री. अविनाश मुरलीधर पवार* यांनी दि. 29/07/2026 रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पुराव्यासह तक्रार केली होती.

*मनसेच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई*
श्री. पवार यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट म्हटले होते की, “अधिकृत शासकीय वाहनांवर बेकायदेशीरपणे काळ्या रंगाच्या काचा लावल्या आहेत. अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करून काळ्या काचा काढण्यात याव्यात. अन्यथा मनसे कार्यकर्ते जिथे RTO ची गाडी दिसेल तिथे ती फोडतील.”

या कडक भूमिकेची दखल घेत *प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहिल्यानगर श्री. विनोद सगरे* यांनी दि. 28/06/2025 रोजी *कार्यालयीन आदेश क्र. 992* काढला आहे.

*आदेशात काय आहे?*
1. अहिल्यानगर जिल्ह्यातील *सर्व शासकीय वाहनांवरील काळ्या काचा तात्काळ काढून* कायदेशीर कारवाई करावी.
2. सर्व तालुकानिहाय मोटर वाहन निरीक्षकांना आदेश देऊन तपासणी करून *दोषी वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई* करण्याचे निर्देश.
3. केलेल्या कारवाईचा *अहवाल वरिष्ठांकडे सादर* करण्याचे आदेश.

अविनाश पवार म्हणतात…
“सामान्य माणसाला हेल्मेट, सीट बेल्टसाठी दंड करणारे अधिकारी स्वतः नियम तोडत होते. मनसेने आवाज उठवल्यानंतर RTO ला कारवाई करावीच लागली. हे सत्याच्या विजयाचे पहिले पाऊल आहे. पुढे सुपा MIDC मधील अवैध उत्खन प्रकरणी पण आम्ही असेच दणके देऊ”

*मनसेचा इशारा:*
15 दिवसात सर्व वाहनांवरील काळ्या काचा न काढल्यास संपूर्ण जिल्ह्यात *मनसे स्टाईल आंदोलन* करण्यात येईल.

2) पारनेर:-‘जिजाऊ माँसाहेब आदर्श संपादक पुरस्कार’ पत्रकार सुरेश खोसे पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान.

पत्रकारितेतील प्रामाणिक कार्याचा गौरव , सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते सन्मान .

पारनेर -(राजकुमार इकडे) पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिक, निर्भीड आणि समाजहिताची भूमिका सातत्याने बजावत असलेल्या पत्रकार तथा दैनिक पारनेर समर्थचे संपादक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा निवड समिती चे जिल्हाध्यक्ष सुरेश खोसे पाटील यांना राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ‘जिजाऊ माँसाहेब आदर्श संपादक पुरस्कार’ सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आष्टी तालुका मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार परिषद यांच्या वतीने आयोजित विशेष समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
समाजाभिमुख पत्रकारिता, सत्यनिष्ठ वृत्तांकन आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना संपादक सुरेश खोसे पाटील यांनी हा सन्मान केवळ वैयक्तिक गौरव नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा असल्याची भावना व्यक्त करत ते पुढे म्हणाले की, “पत्रकारिता क्षेत्रातील प्रामाणिक कार्याची दखल घेऊन दिलेला हा सन्मान माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून भविष्यात अधिक जोमाने, निष्ठेने आणि समर्पण भावनेने कार्य करण्याची प्रेरणा आहे. राजमाता जिजाऊंच्या विचारांचा आणि संस्कारांचा आदर्श समोर ठेवून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.”
पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार परिषद व संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुरस्कार निवड समितीचे मनःपूर्वक आभार मानले. पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे विशेष अभिनंदन केले.
समारंभास विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन संपादक सुरेश खोसे पाटील व पत्रकार सौ . निलम खोसे पाटील यांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचा गौरव केला.
गेल्या अनेक वर्षांपासून खोसे पाटील दाम्पत्य यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, विद्यार्थी, सामाजिक, शैक्षणिक आणि विकासविषयक मुद्दे सातत्याने प्रभावीपणे मांडले आहेत. त्यांच्या निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेमुळे समाजात त्यांना विशेष मानाचे स्थान मिळाले आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान तर झाला आहेच, शिवाय ग्रामीण पत्रकारितेत कार्यरत असलेल्या अनेक पत्रकारांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
‘जिजाऊ माँसाहेब आदर्श संपादक पुरस्कार’ हा पुरस्कार पत्रकारितेतील मूल्याधिष्ठित, समाजहिताची जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या संपादकांचा गौरव करणारा मानाचा पुरस्कार मानला जातो. हा सन्मान मिळाल्याबद्दल सुरेश खोसे पाटील यांच्यावर विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे पारनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्राचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
यावेळी ज्येष्ठ उद्योजक एन बी धुमाळ , मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तान्हाजी जंजीरे , माजी जिल्हाध्यक्ष सिताराम पोकळे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button