आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी सौ. वर्षा पाटोळे यांनी स्वीकारला पदभार; उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविला.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी सौ. वर्षा पाटोळे यांनी स्वीकारला पदभार; उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविला.

कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी अनुभवी व कार्यक्षम अधिकारी सौ. वर्षा पाटोळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा माहिती कार्यालयाला अनुभवी नेतृत्व लाभले असून, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यापूर्वी कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सचिन अडसूळे यांची सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली आहे. तसेच कोल्हापूर विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाल्यानंतर, सातारा येथून बदली होऊन कोल्हापूरमध्ये रुजू झालेल्या सौ. वर्षा पाटोळे यांच्याकडे कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपविण्यात आला आहे.
सौ. वर्षा पाटोळे यांनी यापूर्वी नाशिक, धुळे, डहाणू, मुंबई, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे जिल्हा माहिती अधिकारी तसेच माहिती व जनसंपर्क विभागातील विविध महत्त्वाच्या पदांवर उल्लेखनीय सेवा बजावली आहे. शासनाच्या माहिती व जनसंपर्क यंत्रणेत त्यांनी विविध जबाबदाऱ्या अत्यंत प्रभावीपणे पार पाडत प्रशासकीय कामकाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शासनाच्या विविध योजना, जनजागृती अभियान, विकासकामे तसेच प्रशासनाच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत अधिक परिणामकारक पद्धतीने पोहोचविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना, जनजागृती मोहिमा, विकास प्रकल्प आणि प्रशासनाच्या उपक्रमांचे प्रभावी प्रसारण करण्यामध्ये सौ. वर्षा पाटोळे यांचा मोठा अनुभव आहे. यापूर्वीही त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काम केल्यामुळे जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक आणि प्रशासकीय रचना त्यांना चांगली परिचित आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा लाभ जिल्हा प्रशासन आणि नागरिकांना निश्चितच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सौ. वर्षा पाटोळे यांच्या नियुक्तीमुळे माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्याला अधिक गती मिळेल, तसेच शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा प्रशासनातील अधिकारी आणि विविध स्तरांतील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button