आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-वाईच्या विकासाचा निर्धार! “प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार” – ना.जयकुमार गोरे यांची ठाम ग्वाही.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-वाईच्या विकासाचा निर्धार! “प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार” – ना.जयकुमार गोरे यांची ठाम ग्वाही.

सातारा | वाई दि.२४:
वाई शहराचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य जाहीर सत्कार सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी वाई शहराच्या विकासाबाबत मोठी घोषणा केली. “वाई शहराला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केल्याशिवाय पुढील निवडणुकीत मत मागायला येणार नाही,” अशी ठाम ग्वाही देत वाईच्या विकासासाठी आवश्यक निधी आणि खंबीर साथ कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात ना. जयकुमार गोरे व आमदार धैर्यशील कदम यांच्या हस्ते नगराध्यक्ष अनिल सावंत तसेच जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर यांचा वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषीभूषण शशिकांत पिसाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, अॅड. दीप्तीताई पिसाळ, विठ्ठल बनसोडे, चिन्मय कुलकर्णी, उपनगराध्यक्ष घनशाम चक्के, मंडल अध्यक्ष विजय ढेकाणे, प्रताप यादव, सौ. सरिता अनिल सावंत, नगरसेवक प्रसाद बनकर, सचिन सावंत, संग्राम सपकाळ, सौ. दीपाली सावंत, सौ. ज्योती गांधी, नूतन मालुसरे, केतकी पाटणे, डॉ. जागृती पोरे, अपर्णा जमदाडे, पद्मा पाडळे, डॉ. मकरंद पोरे, जितेंद्र पिसाळ, प्रवीण जाधव, निलेश मोरे, संतोष जमदाडे, स्वप्नील भिलारे, श्रीकांत सावंत आणि विजय पाटणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, “अनिल सावंत यांच्या हातून वाई शहराची अधिक प्रभावी सेवा घडावी, त्यांनी हाती घेतलेली प्रत्येक विकासकामे पूर्ण व्हावीत, यासाठी आवश्यक निधी आणि माझी खंबीर साथ कायम राहील.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत त्यांनी वाईसह सातारा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आमदार धैर्यशील कदम म्हणाले, वाई ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. शहराच्या विकासासाठी ‘नमामी कृष्णा’ प्रकल्प गंगेच्या धर्तीवर साकार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, वाई नगरपालिकेच्या नगरसेवकांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच आपण विधान परिषदेवर निवडून आलो, असे सांगत त्यांनी सर्व वाईकरांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गायन स्पर्धा, ढोल पथक वादन स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान, दिव्यांगांचा सन्मान अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच ना. जयकुमार गोरे व आमदार धैर्यशील कदम यांचाही वाईकरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले, तर निलेश मोरे यांनी आभार मानले. यावेळी वाईकर नागरिक, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button