ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-“आरोपांचा फुसका बार… अन् ७५ लाखांची बचत!; वाईच्या टेंडरवर नगराध्यक्ष अनिल सावंतांचा विरोधकांना सणसणीत झटका”.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-“आरोपांचा फुसका बार… अन् ७५ लाखांची बचत!; वाईच्या टेंडरवर नगराध्यक्ष अनिल सावंतांचा विरोधकांना सणसणीत झटका”

‘सृष्टी कन्स्ट्रक्शन’शी माझा काडीमात्र संबंध नाही; “टेंडरमध्ये नगराध्यक्षाचा हातच लागत नाही”, सावंतांचा रोखठोक खुलासा.

सातारा | वाई, दि. १७ :
वाई नगरपरिषदेच्या टेंडरवरून सोशल मीडियात उठलेल्या धुरळ्याला नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन चांगलंच उत्तर दिलं. “भ्रष्टाचार झाला” म्हणणाऱ्यांवर त्यांनी जोरदार पलटवार करत, “उलट नगरपालिकेचे ७५ लाख रुपये वाचवले,” असा दावा केला.
सावंत म्हणाले, “टेंडर प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असते. तिच्या किल्ल्या अधिकाऱ्यांकडे असतात. नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांना त्यात हात घालता येत नाही.” सर्वात कमी दराची निविदा नियमाप्रमाणे मंजूर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियात चर्चेत असलेल्या ‘सृष्टी कन्स्ट्रक्शन’ कंपनीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “त्या कंपनीशी माझा काडीमात्र संबंध नाही. मी त्यांना ओळखतही नाही.”
यावेळी सावंतांनी विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला. ५ कोटींच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पावर डोळा असलेल्या काहींनी टेंडर आपल्या मर्जीप्रमाणे वळवण्याचा प्रयत्न केला. नगरसेवकांना आमिष दाखवली, मंत्र्यांच्या पी.ए.चे नाव सांगून प्रशासनावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला. पण आम्ही पारदर्शकतेवर ठाम राहिलो, म्हणूनच आता बदनामीचे राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
१४ महिने रखडलेलं ५ कोटींचं टेंडर ४ कोटी २५ लाखांत मंजूर झालं. म्हणजे थेट ७५ लाख रुपये वाईकरांचे वाचले. “वाईकरांचा पैसा वाचवणं जर गुन्हा असेल, तर असा गुन्हा मी रोज करायला तयार आहे,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
तसेच, या प्रकरणातील सर्व कागदपत्रे नगरपालिकेत उपलब्ध असून ज्यांना शंका आहे त्यांनी थेट येऊन फाईल तपासावी, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.
नगराध्यक्षांच्या या रोखठोक पत्रकार परिषदेनंतर वाईच्या राजकारणात आता नवा सामना रंगणार की वाद इथेच थांबणार, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button