सिंधुदुर्ग:-“माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह मुलावर गुन्हा; सुनेच्या तक्रारीने राजकीय वर्तुळात खळबळ!”
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह मुलावर गुन्हा; सुनेच्या तक्रारीने राजकीय वर्तुळात खळबळ!”

• छळ, फसवणूक, अघोरी जादूटोणा आणि आर्थिक शोषणाचे गंभीर आरोप
• तीन भोंदू बाबांसह एकूण सहा जणांविरोधात विरार पोलिसांत गुन्हा दाखल.
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा नगरसेवक मुलगा गितेश राऊत यांच्यासह कुटुंबातील आणखी एका सदस्यावर तसेच सावंतवाडीतील फिरोज बाबा, कुडाळचे हरिश्चंद्र घाडी आणि काजी बाबा या तीन भोंदू बाबांविरोधात मुंबईतील विरार पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गितेश राऊत यांची पत्नी गिरीजा गितेश राऊत यांनी दिलेल्या सविस्तर तक्रारीनुसार, लग्नापूर्वी स्वतःचा बंगला असल्याचे खोटे सांगून फसवणूक करण्यात आली. तसेच पतीचे नपुंसकत्व लपवण्यासाठी भोंदू बाबांच्या माध्यमातून अघोरी जादूटोण्याचे प्रकार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे शारीरिक व मानसिक छळ, आर्थिक खच्चीकरण, तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार घडल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे विरार पोलिसांनी संबंधित सर्व आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
या हाय-प्रोफाइल प्रकरणामुळे सिंधुदुर्गसह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, तपासातून नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




