वाई:-रविवारी अविनाश धर्माधिकारी वाईत – १२ जुलैला वाईच्या जनता शिक्षण संस्थेचा ५९ वा वर्धापन दिन.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

रविवारी अविनाश धर्माधिकारी वाईत – १२ जुलैला वाईच्या जनता शिक्षण संस्थेचा ५९ वा वर्धापन दिन.

वाई: दि. १० जुलै,
येथील जनता शिक्षण संस्थेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथील चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक-संचालक व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे रविवार दि. १२ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता किसन वीर महाविद्यालय प्रांगणात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सदर समारंभास संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.
अविनाश धर्माधिकारी हे लेखक, कवी, वक्ता, संघटक, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून महाराष्ट्राबरोबरच देशातही परिचित असून, त्यांच्या चाणक्य मंडल परिवाराच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धापरीक्षेत यश संपादन केले आहे. आज सरांनी उमटवलेल्या पावलांची दिशा धरून चालणारे अनेक विद्यार्थी अक्षरशः काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून कोहिमा पर्यंत सर्व राज्यांत विविध सेवांमध्ये तसेच विदेश सेवेतून जागतिक पटलावर हजारो कार्यकर्ता अधिकारी या मनोभूमीकेतून काम करत आहेत.
कार्यक्रमास वाई पंचक्रोशीतील तरुणांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून, व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी केले आहे.




