वाई नगर परिषदे समोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत बोंबाबोंब आंदोलन नगराध्यक्ष यांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगिती.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई नगर परिषदे समोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत बोंबाबोंब आंदोलन नगराध्यक्ष यांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगिती.

दिनांक 7/07/2026
वाई नगर परिषदेच्या प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे त्याचप्रमाणे पाणीपुरवठा ठेकेदार पोसा व जगवा आणि
1)वाई नगर परिषद हद्दीत 1101+1107ब मध्ये सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधलेले पी-आर सायकल हे दुकान तात्काळ सील करण्यात यावे.
2)अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण करणे हा फौजदारी गुन्हा असलेले संबंधित पी आर सायकल या बांधकामावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
3)वाई नगर परिषदे अंतर्गत मनमानी कारभार करत स्वतःचे आर्थिक हितसंबंध जोपासण्याकरिता पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी जाधव यांनी काम पूर्णत्वाचे अहवाल न घेता दिलेल्या बिलांची चौकशी करून जाधव यांच्या वर चौकशी समिती स्थापन करण्यात यावी.
4) वाई नगरपरिषद पाणीपुरवठा ठेकेदार यांना आतापर्यंत अदा केलेल्या सर्व बिलांची फेर तपासणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या उपस्थितीत स्थळ पाहणी करून करण्यात यावी व दोष आढळल्यास ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
या वर नमूद केलेल्या मागण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लाँग मार्च प्रणेते मा. आमदार, खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांच्या दिशा निर्देशानुसार सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या उपस्थितीत बेमुदत बोंबा-बोंब आंदोलन सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू करण्यात आले होते. सदर आंदोलनाचे दखल घेत वाई नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल सावंत आणि इतर नगरसेवक यांनी आंदोलन स्थळी भेट देत पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत ज्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे ,त्यावर तात्काळ चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित पाणीपुरवठा अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे लवकरच रस्ता रुंदीकरणाच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमण काढण्यात येईल व अनधिकृत बांधकामावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल ,यासंबंधी तत्काळ पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांना बोलवून मीटिंग घेण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्ष यांनी दिल्यानंतर सदर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे .परंतु जर नगराध्यक्षांनी दिलेल्या आश्वासन लवकरात लवकर पूर्ण झाले नाही ,कारवाई झाली नाही तर मात्र पुन्हा बेमुदत आंदोलन यापेक्षा अधिक ताकतीने सुरू करणार असे पीपल्स रिपब्लिकन पार्टिचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सदर आंदोलनास पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित राष्ट्रीय मजदुर सेनेचे सातारा जिल्हा संघटक विकास दादा जाधव, वाई तालुक्याचे अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नित्यानंद मोरे,शहराध्यक्ष रणवीर परदेशी, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, राष्ट्रीय मजदूर सेनेचे वाई तालुका अध्यक्ष चंद्रकांत रासकर,सलमान पटेल, त्याचबरोबर वाई तालुक्याचे उपाध्यक्ष संतोष शेळके आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या या आंदोलनास शिवसेनेचे अजित घोडके त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धनराज कांबळे यांनी देखील उपस्थित राहून समर्थन घोषित केले.




