आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-“आरोग्य, पर्यावरण आणि विठ्ठल भक्तीचा अनोखा संगम! श्रीरामपुरातून ११० सायकलस्वारांची पंढरपूरकडे उत्साहपूर्ण वारी”

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“आरोग्य, पर्यावरण आणि विठ्ठल भक्तीचा अनोखा संगम! श्रीरामपुरातून ११० सायकलस्वारांची पंढरपूरकडे उत्साहपूर्ण वारी”

श्रीरामपूर | RPS स्टार न्यूज प्रतिनिधी
“सायकल चालवूया, आरोग्य जपूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया” हा सामाजिक संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्रीरामपूर सायकलिंग क्लबच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्रीरामपूर ते पंढरपूर सायकल वारी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. ही वारी दि. १० जुलै ते १२ जुलै २०२६ या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती क्लबचे प्रमुख डॉ. संकेत मुंदडा आणि पंढरपूर सायकल वारी नियोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली बघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाच्या सायकल वारीमध्ये श्रीरामपूर आणि पाचेगाव येथील तब्बल ११० सायकलस्वार सहभागी होणार असून, वारीचा शुभारंभ शुक्रवार, दि. १० जुलै रोजी पहाटे ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. विठ्ठलनामाच्या गजरात आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश देत सायकलस्वार पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.
रविवार, दि. १२ जुलै रोजी पंढरपूर येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे १० हजार सायकल वारकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर सायकलस्वारांचे भव्य संमेलन आयोजित करण्यात आले असून, या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
ही सायकल वारी यशस्वी करण्यासाठी डॉ. संकेत मुंदडा व दाविंदरसिंग धुप्पड यांच्या नेतृत्वाखाली नियोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली बघे, डॉ. अपूर्वा शिरसाठ, डॉ. मोनिका सचिती, डॉ. वाल्मिक तुवर, भास्कर शिंदे, नम्रता मुंदडा, दीप्ती दहिनिवाल, हर्षद महाजन, सौरभ म्हेत्रस, ज्ञानदेव चौधरी आणि राहुल सागडे यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत असून, वारीच्या नियोजनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.
सायकल वारी ही केवळ पंढरीची भक्ती नसून आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी संदेश देणारी चळवळ ठरत असल्याने यंदाच्या वारीबाबत सहभागी सायकलस्वारांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button