आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-अमृतेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास अमृतवाहिनी बँकेकडून सांस्कृतिक मंचाची भेट; भूमिपूजन संपन्न.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अमृतेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास अमृतवाहिनी बँकेकडून सांस्कृतिक मंचाची भेट; भूमिपूजन संपन्न.

श्रीरामपूर (RPS स्टार न्यूज प्रतिनिधी):
संगमनेर खुर्द येथील अमृतेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स. म. भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक मंचाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. संगमनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांनी सौ. दुर्गाताई तांबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या सामाजिक व लोकहिताच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी मा. रमेश गुंजाळ यांनी प्रास्ताविक करत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. त्यानंतर मा. सुभाष पा. गुंजाळ यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, गुणवत्ता वृद्धीसाठी सुरू असलेले प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वतंत्र सांस्कृतिक मंचाची आवश्यकता अधोरेखित केली.
विद्यालयाची गरज लक्षात घेऊन स. म. भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेने विद्यालयासाठी सांस्कृतिक मंच उभारून देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाबद्दल उपस्थितांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन श्री. सुधाकर जोशी यांनी आपल्या मनोगतात बँकेमार्फत दरवर्षी अनेक शाळा, सामाजिक संस्था व विद्यार्थ्यांसाठी विविध स्वरूपाची मदत केली जात असल्याचे सांगितले. तसेच बँकेच्या विविध योजना, सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमास अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन श्री. सुधाकर जोशी, व्हाइस चेअरमन श्री. नानासाहेब शिंदे, संचालक श्री. सुभाष पा. गुंजाळ, संगमनेर तालुका दूध संघाचे संचालक मा. रमेश गुंजाळ, सरपंच सौ. श्वेताताई मंडलिक, माजी सरपंच अजित गुंजाळ, अक्रम शेख, किसन सातपुते, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य श्री. दारोळे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button