ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर; रस्ते बंद, दरडी कोसळल्या, गावांचा संपर्क तुटला – नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर; रस्ते बंद, दरडी कोसळल्या, गावांचा संपर्क तुटला – नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन.

महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे महाबळेश्वरचा प्रमुख महामार्ग कारवीचा आळा परिसरात मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


चतुरबेट गावाचा मुख्य संपर्क पूर्णपणे तुटला असून विवर गावाच्या प्रमुख रस्त्यावरही मोठी दरड कोसळल्याने गावाचा बाहेरील संपर्क खंडित झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सोळशी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या अनेक ठिकाणी पुराचे पाणी वेगाने वाहत आहे. काही ठिकाणी नदीकाठची माती व बांध वाहून जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. नदीकाठी जाणे किंवा पूरग्रस्त भागात फिरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.


तालुक्यातील महसूल, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, ग्रामपंचायत तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, दरडप्रवण भाग, नदी-नाले आणि पूल परिसरापासून सुरक्षित अंतर राखावे तसेच शासन व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.
हवामानातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने जपावी.
– महाबळेश्वर प्रतिनिधी : उत्तम भालेराव

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button