कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-“प्रणित मोरे यांच्या जागरूकतेमुळे टळला मोठा अनर्थ; सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्यायी पूल खचून वाहून गेला!”

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-“प्रणित मोरे यांच्या जागरूकतेमुळे टळला मोठा अनर्थ; सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्यायी पूल खचून वाहून गेला!”

गेले दीड वर्ष सुरू असलेल्या भोर मांढरदेव वाई रस्ता सर्वांनाच परिचित आहे. भला मोठा कालावधी उलटला परंतु रस्ता काही अजून पर्यंत पूर्ण झालाच नाही. जेवढा केला आहे त्याच्या निकृष्टतेचा आवाज विधान भवनात गाजला. याच रस्ता कामांमध्ये वाई शहरातील रविवार पेठ आणि महात्मा फुले नगर या दोन भागांना जोडणारा किवरा ओढा यावरील पूल देखील आहे. संपूर्ण उन्हाळा गेला परंतु ठेकेदाराने पुलाकडे डुंकवून पण पाहिले नाही परंतु आता कामाची मुदत संपणार आहे ,मुदत संपल्यानंतर आपल्यावर दंड आकारला जाईल या भीतीने संबंधित ठेकेदार शंकर रामचंद्र इन्फ्रा याने भर पावसातच पुलाचे काम करणार असे जाहीर केले. पर्यायी पुलाचे उभारणी केली, यावेळी सर्वजण गप्प असताना देखील स्थानिक जागृत नागरिक म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी संबंधित कामाशी निगडित असणारे अधिकारी योगेश मेटेकर त्यांच्याशी फोनवर संवाद साधला . मेटेकर यांचे म्हणणे असे आले की आम्हाला पाण्याचा अंदाज आहे ,आणि त्यानुसारच आम्ही पर्यायी पूल बनवला आहे .त्यावेळी देखील प्रणित मोरे यांनी एवढ्या वर्षात आम्हाला पाण्याचा अंदाज आला नाही ,तुम्हाला कसा काय येईल असे त्यांना विचारले परंतु आम्ही सगळे व्यवस्थित करू असे आश्वासन प्रशासनाने दिले. प्रशासनाच्या आश्वासनाच्या विश्वासावर बसले तर मग काम झाले समजायचे , म्हणून संबंधित कामाचे मुख्य अभियंता यांची मुंबई येथे जाऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भेट घेण्यात आली. सदर काम पावसाळ्यात न करता ते पावसाळा झाल्यानंतर करण्यात यावे , पूल पाडण्याची प्रक्रिया थांबवण्यात यावी असे पत्र मुख्य अभियंता यांना देण्यात आले .सदर पूल पाडला असता मोठा अपघात घडेल, पर्यायी पूल टिकणार नाही, असे देखील मुख्य अभियंता हांडे साहेब यांना निवेदन देऊन सांगण्यात आले. या सर्व गोष्टींची तात्काळ दखल घेऊन त्यांनी सदर पूल पाडण्याचे काम थांबवण्याचे आदेश दिले. आज दिनांक 5 जुलै रोजी दुपारच्या वेळी पर्यायी पूल वाहून गेला. पीपल्स रिपब्लिकन पार्टीने वेळेतच भूमिका घेऊन मुख्य अभियंता यांची भेट घेऊन संबंधित पावसाळ्यात पूल पाडण्याचे काम थांबवले त्यामुळे घडणारा अपघात टळला.
परंतु आता संबंधित कामाचे ठेकेदार व अधिकारी योगेश मेटेकर यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियम व अटी झूगारून, जोखीम कालावधी पावसाळा असताना देखील ,मुद्दाम पूल बंद करून स्थानिकांना त्रास देणाऱ्या व स्थानिकांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या या अधिकारी व ठेकेदार यांच्या विरोधात पुढील लढा आता आक्रमकपणे लढणार असे देखील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी सांगितले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button