सातारा:-धैर्यशीलदादा कदम यांची सातारा- सांगली विधान परिषद आमदार पदी निवड; नागठाणे नगरीत ग्रामस्थांकडून भव्य सत्कार.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

धैर्यशीलदादा कदम यांची सातारा- सांगली विधान परिषद आमदार पदी निवड; नागठाणे नगरीत ग्रामस्थांकडून भव्य सत्कार.

सातारा:- सातारा- सांगली विधान परिषद आमदार पदी निवड झाल्याबद्दल धैर्यशील दादा कदम यांचा नागठाणे नगरीतील ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत ग्रामविकास मंत्री श्री.जयकुमार गोरे भाऊ, कराड उत्तराचे आमदार श्री.मनोज दादा घोरपडे , सातारा पंचायत समिती विद्यमान सदस्य श्री.संतोष साळुंखे पाटिल, ज्येष्ठ नेते श्री.आनंदराव नलवडे आबा, ग्रामस्थांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.
धैर्यशीलदादा कदम यांच्या निवडीमुळे नागठाणे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी त्यांच्यावरील विश्वास व्यक्त करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कदम यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
सत्काराला विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




