सातारा:-आत्मविश्वासाच्या बळावर संजना अशोक कदम यांची मुंबई पोलीस दलात दमदार भरारी; कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आत्मविश्वासाच्या बळावर संजना अशोक कदम यांची मुंबई पोलीस दलात दमदार भरारी; कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण.
सातारा: संघर्ष अकॅडमी शहापूर येथील विद्यार्थीनी, मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संजना अशोक कदम यांनी मुंबई पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लहानपणापासूनच समाजसेवा आणि शिस्तप्रिय जीवनाची आवड असलेल्या संजना अशोक कदम यांनी पोलीस भरतीसाठी कठोर परिश्रम घेतले. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि इतर सर्व टप्प्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले आहे. मुंबई पोलीस भरती प्रक्रियेचे निकाल आणि भरती विषयक माहिती अधिकृत रीत्या प्रसिद्ध करण्यात आल्या नंतर
संजना यांच्या या यशामुळे राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कृत (मुंबई येथील माझी पोलिस निरीक्षक) श्री.बत्तू तात्याबा मोहिते व सातारा जिल्हा परिषद नागठाणे गटाचे विद्यमान सदस्य श्री.अजित साळुंखे सर यांनी संजना ला शाल श्रीफळ देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले असून, तिच्या या यशामुळे अनेक युवक-युवतींना प्रेरणा मिळणार आहे. तिच्या पुढील सेवा काळासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





