श्रीरामपूर:- ग्रामीण मातीतून यशाची भरारी ! जिद्द, परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून स्वराज मोहनचा उज्ज्वल यशस्वी प्रवास.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:- ग्रामीण मातीतून यशाची भरारी !
जिद्द, परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून स्वराज मोहनचा उज्ज्वल यशस्वी प्रवास.

गावाच्या मातीतील लेकरांनी पुन्हा दाखवली जिद्द
संघर्षातून उभी राहत आहे नव्या पिढीची यशोगाथा
ग्रामीण भागातून यशाची झेप जिद्द परिश्रम आणि यशाचा आभिमान : चि . स्वराज मोहन यांचा गौरव सोहळा
श्रीरामपुर / माळेवाडी ( RPS स्टार न्युज प्रतिनिधी ) ग्रामीन भागातील अनेक अडचणी व मर्यादांवर मात करत इयत्ता १०वी परीक्षेत ८८ .८० % गुण मिळवून कै रघुनाथ कृष्णाजी पाटील औताडे विद्यालय , माळेवाडी येथे द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या चि स्वराज अण्णासाहेब मोहन यांचा शाळेच्या वतीने जाहीर सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कुंडलिक शिरोळे सर होते त्यांच्या हस्ते शाळेच्या वतीने चि स्वराज मोहन यांचा शाल , पुष्पगुच्छ व पेढे भरवून सत्कार करण्यात आला . उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वराजचे अभिनंदन केले
यावेळी वर्गशिक्षक कुलकर्णी सर , गणित विषयांचे शिक्षक हाके सर तसेच ठाकरे सर , थोरात सर , शिंदे सर , व औताडे सर , सर्व शिक्षक ‘ शिक्षिका यांनी स्वराजच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या . शिक्षकांनी सातत्यापुर्ण अभ्यास , शिस्तबद्ध नियोजन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगितले
स्वराजचे वडील ॲड अण्णासाहेब मोहन व आई सौ . सारिका मोहन यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील अडचणींवर मात करत स्वराज ने द्वितीय क्रमांक पटकावीला . मुलाच्या या यशाबद्दल बोलताना त्यांच्या भावना अनावर झाल्या
कार्यक्रमास रामभाऊ औताडे पाटील , मोहम्मद भाई सय्यद ‘ शिवाजी डबाळे , कार्तिक रहाटवाडे , कचरू मोहन , रावसाहेब मोहन , रविंद्र औताडे व शरद गलांडे , आदी उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमारी सांची मोहन , कुमारी सोनाली मोहन , सौ अंजु मोहन , श्रीमती सत्यभामा मोहन व रू बाबबाई शेख यांनी विशेष परिश्रम घेतले
ग्रामीण भागातील संघर्षावर मात करत मिळवलेले हे यश इतर विद्याथ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून चि स्वराज मोहन यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी रमेश दिवे , सुभाष उंदरे , ॲड .आण्णासाहेब मोहन व सरपंच शंकर विटेकर चेअरमन मथुराम पवार शंकर पवार यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळात्याचे सांगून शिक्षाकांचे आभार मानले .

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



