क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाटण:-(सातारा)-दारूचा धंदा बेधुंद; प्रशासन मुकबधिर? पाटणातील अवैध दारू विक्रीवर कारवाईची मागणी.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

दारूचा धंदा बेधुंद; प्रशासन मुकबधिर?
पाटणातील अवैध दारू विक्रीवर कारवाईची मागणी.

पाटण तालुक्यातील धामणी परिसरात अवैध दारू विक्रीचे मोठे रॅकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
निवेदनानुसार, धामणी येथील काही व्यक्तींकडून गेल्या अनेक वर्षांपासून गोवा राज्यातून बनावट बिअर, देशी दारू व इतर मद्य मोठ्या प्रमाणावर आणून करपेवाडी, आरडे, बाबरवाडी, मस्करवाडी, राणेवाडी आदी गावांमध्ये अवैधरित्या विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, या बेकायदेशीर धंद्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करून दुचाकीवरून दारूची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
संबंधितांकडे कोणताही परवाना नसताना खुलेआम विक्री सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही बाब अनेक वेळा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आणून देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या जोरावर हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आयु. उत्तम यदुनाथ भालेराव यांनी दिलेल्या निवेदनात, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी व अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

चौकट

“जिल्ह्यात कोणताही अवैध व्यवसाय चालू देणार नाही. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी व आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल.”
— जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button