ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-सातारा भाजप सोशल मीडियाला नवी दिशा; पंकज पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा भाजप सोशल मीडियाला नवी दिशा; पंकज पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.

कराड: -भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी पंकज पाटील यांची नियुक्ती झाल्याने कराड दक्षिणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षनिष्ठा, सातत्यपूर्ण संघटनात्मक काम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
पंकज पाटील यांनी यापूर्वीही सोशल मीडिया क्षेत्रात प्रभावी काम करत पक्षसंघटना बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. कराड दक्षिण भागात पक्षविस्तारासाठी त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल आमदार डॉ. अतुल भोसले, भाजपचे विविध पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आगामी काळात सातारा जिल्ह्यात भाजपची सोशल मीडिया यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी पंकज पाटील यांच्या नेतृत्वाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
राजकीय वर्तुळातही त्यांच्या या नियुक्तीकडे विशेष लक्ष वेधले गेले असून, संघटनात्मक कार्यपद्धती, नेतृत्वगुण आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेता भविष्यात पक्षसंघटनेत त्यांना आणखी मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना पंकज पाटील म्हणाले की,
“पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार असून सातारा जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button