क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-नसरापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वाईत महिला दक्षता समितीची तातडीची बैठक; महिलांच्या सुरक्षेवर भर.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नसरापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वाईत महिला दक्षता समितीची तातडीची बैठक; महिलांच्या सुरक्षेवर भर.

वाई : वाई पोलीस ठाण्यात दि. ०५/०५/२०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजता महिला दक्षता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी भूषवले.
बैठकीदरम्यान महिलांचे विविध प्रश्न, अडीअडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर विचारमंथन करण्यात आले. अशा घटना रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज उपस्थित करण्यात आली.
या बैठकीस महिला दक्षता समितीच्या सदस्यांमध्ये निर्मला कणसे, जागृती पोरे, तनुजा इनामदार, ज्योती गांधी, सारिका गवते, सश्मिता जैन, सुनंदा कट्टे यांची उपस्थिती होती. तसेच गोपनीय विभागाचे प्रसाद दुदुस्कर सर यांनीही सहभाग नोंदवला.
महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन ठोस पावले उचलण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button