कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर भूमिअभिलेखला सक्षम भुमि अभिलेखसह कर्मचारी नेमा – शरद पवळे

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर भूमिअभिलेखला सक्षम भुमि अभिलेखसह कर्मचारी नेमा – शरद पवळे( प्रणेते, महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ)

*पारनेरमध्ये शेतरस्ता,जमिन मोजणी प्रकरणे रखडली*

*अन्यथा जिल्हा अधिक्षकांच्या दालनात पूर्वसूचना न देता ठिय्या आंदोलन करणार- पवळे*
आहिल्यानगर,( राजकुमार इकडे)
पारनेर तालुक्यातील शेतरस्ते व जमिनीच्या मोजणीसंबंधी सुमारे २,५०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, आहिल्यानगर यांना निवेदन सादर करत तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे.
शेतरस्त्यांची हद्द स्पष्ट नसल्यामुळे गावोगावी वाद निर्माण होत असून शेतीच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक तसेच मानसिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने भूमी अभिलेख कार्यालयात येत असले तरी, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. परिणामी प्रशासनावरील विश्वास कमी होत चालल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
📌 मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
👉 सर्व प्रलंबित शेतरस्ता व मोजणी प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत
👉 मोजणीसाठी विशेष मोहीम राबवून अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत
👉 प्रत्येक प्रकरणासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी
👉 पूर्ण झालेल्या प्रकरणांचा अहवाल महसूल विभागाकडे सादर करावा
👉 पारनेर कार्यालयात कायमस्वरूपी उपअधीक्षक व पुरेसे मोजणी कर्मचारी नियुक्त करावेत
👉 “रोड मॉडेल व्हिलेज” अंतर्गत सर्व रस्त्यांची हद्द निश्चित करून झिरो पेण्डसी साध्य करावी
⚠️ इशारा :
निवेदनाची दखल न घेतल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता जिल्हा अधिक्षकांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांसह अहिल्यानगर जिल्हा अधिक्षक संजय कुंभार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button