आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-एन.एम.एम.एस. परीक्षेत श्री शिवाजी विद्यालय, कराडचा दैदिप्यमान यश.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

एन.एम.एम.एस. परीक्षेत श्री शिवाजी विद्यालय, कराडचा दैदिप्यमान यश.

कराड :- श्री शिवाजी विद्यालय, कराड येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस. (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेत राहिश जाहिद इनामदार व समर्थ श्याम ढोणे या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवत केंद्र शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण विद्यालय व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सचिव मा. श्री. जयंतकाका पाटील, खजिनदार मा. श्री. संजय बदीयानी, संचालक मा. श्री. संभाजीराव सुर्वे, तसेच मुख्याध्यापक श्री. टी. डी. जाधव आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button