ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-“कामगारांच्या हक्कासाठी रणशिंग!” – साताऱ्यात शिव कामगार सेनेचा मोठा डाव, ३० एप्रिलला वाईत पदनियुक्ती मुलाखती.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“कामगारांच्या हक्कासाठी रणशिंग!” – साताऱ्यात शिव कामगार सेनेचा मोठा डाव, ३० एप्रिलला वाईत पदनियुक्ती मुलाखती.

वाई, दि. २८ : सातारा जिल्ह्यातील औद्योगिक कामगारांचा आवाज आता अधिक बुलंद करण्यासाठी शिवसेना-प्रणीत शिव कामगार सेना आक्रमक पवित्रा घेत मैदानात उतरली आहे. कामगारांचे प्रश्न सोडवणे आणि संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी ३० एप्रिल २०२६ रोजी वाई येथील सर्किट हाऊस येथे दुपारी १ वाजता पदनियुक्ती मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.
शिव कामगार सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष योगेश फाळके यांनी या उपक्रमाची माहिती देताना औद्योगिक क्षेत्रातील गंभीर प्रश्नांवर थेट बोट ठेवले. “एमआयडीसी आणि औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक कामगारांना डावलले जात आहे, परप्रांतीय कामगारांची संख्या वाढतेय, आणि सुरक्षिततेच्या साधनांचा मोठा अभाव आहे. कंत्राटी पद्धतीमुळे कामगारांवर अन्याय होत असून अनेक ठिकाणी कामगार कायद्यांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
फाळके पुढे म्हणाले, “या अन्यायाविरुद्ध लढा उभारणे आणि स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी ताकद आहे.”
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिद्दी शिवसैनिक, कामगार नेते आणि समाजकार्यात रस असलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“कामगारांचा हक्क – आमची जबाबदारी!” या ब्रीदवाक्याने सज्ज झालेल्या या मोहिमेमुळे सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होणार, अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button