सातारा राजवाडा चौपाटीवर परप्रांतीयांचा धुडगूस,, व्यवसाय बंद करण्याचा इशारा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा राजवाडा चौपाटीवर परप्रांतीयांचा धुडगूस,, व्यवसाय बंद करण्याचा इशारा.

(अजित जगताप)
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहराला आता खऱ्या अर्थाने परप्रांतीयांनी वेढा दिलेला आहे. स्थानिक काही मुठभर लोकांना भाडे मिळते. त्यामुळे परप्रांतीयांची दादागिरी आता सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचले आहे. याची झळ राजवाडा चौपाटीलाही बसली असून कारवाई कडक करावी. अशी मागणी पुढे आलेली आहे.
दरम्यान, सातारचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी कायमस्वरूपी राजवाडा चौपाटी बंद करण्याचा इशारा दिला आहे. परप्रांतीयांकडून भाडे कोण वसूल करते? त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी राजवाडा चौपाटीवर नियमितपणाने खाद्य विकत घेणाऱ्या ग्राहकांनी केली आहे. याबाबत माहिती अशी की, सातारा शहराचे भूषण म्हणजे प्रताप सिंह हायस्कूल व राजवाडा हे दोन अस्मितेचे प्रतीक आहेत. याच ठिकाणी गेले पंचवीस वर्षापासून काही प्रामाणिक व्यवसायिक व्यवसाय करत होते. आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांनी भाडे देऊन घुसखोरी केलेली आहे. खंडणी ,दमदाटी, गुंडगिरी, राजकीय छुपा पाठिंबा व स्थानिक काही लोकांचा त्यामध्ये हस्तक्षेप होत असल्याने परप्रांतीयांना संरक्षण मिळत आहे. त्यामुळे त्यांनी आता हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्याची झळ सातारकरांना सोसावी लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी अनभिज्ञ असल्यामुळे अखेर कर्तव्य अध्यक्ष सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनीच पुढाकार घेऊन लोकांच्या भावनेशी खेळणाऱ्या राजवाडा चौपाटी कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा दिला आहे. कारण, या ठिकाणी असलेल्या गोल बागेमध्ये राजवाडा चौपाटीतील काही व्यवसायिक राहिलेल्या खाद्यपदार्थ तसेच टाकून निघून जात आहेत. यामुळे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचाही त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळेला तर राजवाडा चौपाटी येथील काही चायनीज गाडा म्हणजे ओपन बार झालेला आहे. देशी विदेशी दारू पिण्याची सोय होत आहे . व्यासपीठाशेजारी नशा पण करणारे अनेक जण थांबलेले असतात. विशेषतः चायनीज व इतर गाड्यांवर नेहमीच व्यसनी लोकांची गर्दी होत असते. त्याचा त्रास या ठिकाणी दर्जेदार पाणीपुरी व खाद्यपदार्थ खाण्यासाठी येणाऱ्या निर्व्यसनी ग्राहकांना भोगाव लागत आहे. याबाबत अनेकदा तोंडी तक्रार केली पण त्याकडे दखल घेतली नाही. अखेर एकमेकांच्या हाणामारी पर्यंत प्रसंग आल्यानंतर सातारा नगरपालिकेला जाग आली आहे. अनेक नगरसेवकांचे हितसंबंध अशा भाडे वसूल करणारांशी नेहमीच जुळलेले आहेत. अशी ही माहिती पुढे आली आहे. सध्या सातारा शहरात परप्रांतीयांनी सर्वे फुटपाथ व राजवाडा चौपाटी ताब्यात घेतली आहे. स्थानिक मुठभर मंडळींना भाडे मिळत असल्याने ते परप्रांतीयांना संरक्षण देत आहेत. अशा भाडखाउ मंडळींमुळे महिला वर्गाची व लहान मुलांची कुटुंबांना होत आहे. स्थानिक पोलीसही आपले हात ओले करतात अशी शंका घेतली जात आहे. अशा शब्दात राजवाडा चौपाटी व सातारा बस स्थानक परिसरातून नियमित ये जा करणाऱ्या महिलांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे. महिला विधेयकाबाबत सत्ताधारी भाजपने आंदोलन केले पण साताऱ्यातील स्थानिक महिलांवर होणारे अन्यायाबाबत एकही महिला पदाधिकारी धाडसाने एक अक्षर काढत नाहीत. या संधी साधू महिलांपासून सातारच्या नागरिकांनी सावध राहावे. आपला तो बाब्या आणि इतरांचा तो कार्टा असं त्यांचे वागण्या असल्यामुळे सत्ताधारी भाजप विरोधात परप्रांतीयांना संरक्षण देणाऱ्या प्रवृत्ती निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्याची नैतिकता विरोधी पक्षाकडे नसल्यामुळे सध्या सर्व रामभरोसे कारभार सुरू आहे. यावर आता नियंत्रण ठेवण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याची वेळ आल्याची माहिती पुढे आली आहे. ………………………………
2) साताऱ्यात संबोधीने ”’ शिवाजी कोण होता”’ हे कॉ. पानसरेंचे पुस्तक दिले विजेत्यांना…

(अजित जगताप)
सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या साताऱ्यात संबोधि प्रतिष्ठानने साहित्यिक सुधाकर बोरगावकर स्मृती साहित्य पुरस्काराचे वितरण केले. यावेळी शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक विजेत्यांना देऊन सातारी बाणा दाखवला. यावेळी लेखकांनी स्वातंत्र्याचे भान जोपासावे असे मौलिक विचार ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकिहाळ यांनी मांडले.
सातारा शहरातील नगर वाचनालयाच्या पाठक हॉल या ठिकाणी झालेल्या या सोहळ्याला परिवर्तनवादी विचारांचे साहित्य िक व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी युगपुरुषांच्या प्रतिमेला व लेखक सुधाकर बोरगावकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्य किशोर बेडकीहाळ व प्रमोद कोपर्डे यांच्या वैचारिक शब्दांच्या गारव्याने भर उन्हात अनेकांना दिलासा मिळाला. आत्ताचा काळ लेखकांनी स्वातंत्र्याचे भान जोपासण्याचा व आत्मपरीक्षण करण्याचा आहे. मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी निर्भीडपणे लेखन करावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ‘प्रबुद्ध भारत ‘चे साहित्यिक सुधाकर यशवंत बोरगावकर स्मृती राज्यस्तरीय कथासंग्रह पुरस्कार किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे, व्यासंगी अभ्यासक, समीक्षक डॉ.गजानन अपिने(पुणे ), संबोधी प्रतिष्ठानचे संघटक दिनकर झिंब्रे, अध्यक्ष रमेश इंजे, उपाध्यक्ष प्रा.प्रशांत साळवे, विश्वस्त डॉ.जयपाल सावंत उपस्थित होते.
किशोर बेडकिहाळ म्हणाले, सर्जनशील लेखक वैश्विक व स्थानिकही असतो. तो संवेदनशील असला पाहिजे.त्याला माणूस वाचता आला पाहिजे. त्याने नवनवीन प्रश्नाला भिडून मानवी मूल्ये व विवेकाची जोपासणा करण्याची गरज आहे.
प्रमोद मनोहर कोपर्डे म्हणाले, लेखकाने मानवी संबंधाची खोली आणि अवकाश याबरोबरच आपल्या संपूर्ण लेखनात कार्यकारण भाव जोपासला पाहिजे. फुले, झाडे, डोंगर, निसर्गाबरोबर माणूस सुद्धा जिवंत ठेवला पाहिजे. स्त्री-पुरुष संबंधाचे चित्रण करताना स्त्री लेखिकांनी अतिशय मोकळेपणे व परखडपणे मांडणी करण्यास धजावले पाहिजे.
कथासंग्रह स्पर्धेचे परीक्षक डॉ.गजानन अपिने यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व विभागातील प्राप्त झालेल्या व विजेत्या ठरलेल्या कथासंग्रहाचे वैशिष्ट्यांचे यावेळी अतिशय सखोलपणे मूल्यमापन विशद केले. जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद साहित्यात उमटत असल्याचे सांगितले.
कथासंग्रह स्पर्धेतील विजेते व मान्यवरांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे ‘ शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक व भारतीय संविधान उद्देशिका स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचे विजेत्यांनी मनापासून स्वागत केले.
प्रथम क्रमांक :’ तो स्पर्श’ -कविता पाचंग्रे- खरात (शिरुर, पुणे ) द्वितीय क्रमांक : ‘ तू ही गोष्ट सांगायला नको होती!’- सुनील साळुंके ( डोंबिवली, मुंबई ) तृतीय क्रमांक :’ भुईकोर’- गोपाल शिरपूरकर ( चंद्रपूर ), उत्तेजनार्थ :’ सारीपाट ‘- अलका मोकाशी (नागपूर ) व कथाकार प्रदीपकुमार कांबळे – बहेकर (पुणे ) यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ पुरस्कार विजेते ‘ कडेवर आणि इतर कथा ‘ – महेश सोवनी ( भिवंडी, ठाणे) परीक्षामुळे येऊ शकले नाहीत. त्यांना व इतर सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र पाठवण्यात येणार असल्याचे निमंत्रक दिनकर झिंब्रे यांनी सांगितले व
आकर्षक सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह तयार करणारे पुणे येथील कलावंत अतुल घाटगे तसेच भारती बाबासाहेब सावंत (जयसिंगपूर )व मंजिरी अरुण दुधगावकर( पुणे ) सुधाकर बोरगावकर यांची नात डॉ. मनाली नरेंद्र बोरगावकर एमडी आयुर्वेद झाल्याबद्दल तसेच चिरंजीव इंजिनियर महेंद्र बोरगावकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
दिनकर झिंब्रे यांनी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार योजनेची माहिती दिली व चालू वर्षात कादंबरी वाङ्मय प्रकारावर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रशांत साळवे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयपाल सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, विश्वस्त,कार्यकर्ते अशोक कांबळे, ‘जातपीळ’ कादंबरीकार जयवंत भिसे, अशोक भोसले, अँड . विलास वहागावकर, अनिल वीर, अजित जगताप, सुजाता गायकवाड,फाळके मामा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी व वैचारिक भूमिका घेऊन सर्वच व त्यांनी केलेली मांडणी ही खऱ्या अर्थाने साहित्यातील मानबिंदू ठरलेली आहे. प्रमुख वक्त्यांनी या स्पर्धेतील कथासंग्रहातील कथेचे केलेले बारकाईने विश्लेषण हे इतर साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.




