क्रीडा व मनोरंजनदेश विदेश
राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आर्या देवेंद्र बारटक्के हिने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल मा. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडून सत्कार.
प्रतिनिधी:- शैलेंद्र बारटक्के सातारा :-8421693923

सातारा :-आज दि.१४/७/२०२२ रोजी
गुरूकुल स्कुल ,शाहुनगर येथे मा.जिल्हाधिकारी श्री.शेखर सिंह व मा.जिल्हा क्रिडाधिकारी युवराज नाईक व मा.संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कु.आर्या देवेंद्र बारटक्के हिने चेन्नई येथे झालेल्या ५व्या युवा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सातारा जिल्हाचा इतिहास रचला त्या बद्दल दि सातारा जिल्हा ॲमेच्युअर बॉक्सिंग असोसिएशन तर्फे सत्कार समारंभ घेण्यात आला.यावेळी मा.अध्यक्ष श्री.राजेंद्र चोरगे साहेब व पदाधिकारी मान्यवर उपस्तित होते.