खामगांव ग्रामपंचायत मधील पाच सर्कल अंगणवाडीत चिमुकल्यांना जावे लागतेय चिखलातून…खामगांव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
प्रतिनिधी:- शुभम भापकर:-7972521412

*खामगांव ग्रामपंचायत मधील पाच सर्कल अंगणवाडीत चिमुकल्यांना जावे लागतेय चिखलातून*…
*खामगांव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष*
प्रतिनिधी . शुभम भापकर
एकीकडे राज्य शासन लहान मुलांच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी अनेक योजना व सेवा सुविधा पुरवत आहेत परंतु ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कडून अंमलबजावणी होताना दिसत नाहीत
खामगांव ग्रामपंचायत मधील पाच सर्कल येथील अंगणवाडी त ये-जा करण्यासाठी रस्ता असून नसल्यासारखे आहे सध्या संततदार पावसामुळे हा रस्त्या चिखलमय झालेला आहे त्यामुळे परिसरा मधील अंगणवाडीतील चिमुकले तसेच त्यांना सोडण्यासाठी येणारे पालक व अंगणवाडी सेविका यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून वाट काढत जावे लागते तसेच पावसामुळे या रस्त्यावर गवतही वाढलेले आहेच यामुळे सर्वांनाच मानसिक त्रास सहन करावा लागतो शाळेसाठी येणारा शालेय पोषण आहार याची गाडी आली तरी चिखलामुळे अंगणवाडी पर्यंत जात नसल्याने डोक्यावर ओझे घेऊन अंगणवाडी सेविका यांना हा पोषण आहार अंगणवाडी मध्ये न्यावा लागत आहे असे चित्र वारंवार पाहावयास मिळते.
खामगांव ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊनही यावर कोणतेही उपाययोजना करण्यात येत नाही ग्रामपंचायतीकडे हा रस्ता करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याचे सांगून या रस्त्याचे काम टाळले जाते गटविकास अधिकारी यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून किमान पावसाळ्या पुरता तरी या रस्त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून मुरूम टाकुन घेण्यात यावा अशी मागणी येथील परिसरातील पालक व अंगणवाडी सेविका करत आहेत.
मतापुरते येणारे नेते यांनी किमान या मतदारांच्या चिमुकल्यांचा तरी विचार करून या शाळेसाठी जावे लागणारा चिखलमय रस्त्याचा प्रश्न सोडवावा…
दादा जाधव
पक्ष फलटण तालुका अध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना