क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
राहाता तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विखे पाटील यांनी मैदानात उतरून खेळला क्रिकेटचा डाव…
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

राहाता तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विखे पाटील यांनी मैदानात उतरून खेळला क्रिकेटचा डाव…

जनतेच्या सेवेत सदैव तत्पर… पण मैदानात उतरल्यावर पुन्हा एकदा खेळाडूच..
राहाता : जनतेच्या प्रश्नांसाठी दिवसरात्र धावपळ, विकासकामांचा व्याप आणि जबाबदाऱ्यांचा मोठा डोंगर मात्र, या सगळ्यातून थोडासा वेळ काढत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रिकेटच्या मैदानात फलंदाजीचा आनंद घेतला.
राहाता(पिंपळस) येथे सुरू झालेल्या राहाता तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः मैदानात उतरून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
राजकारणाच्या धावपळीतही मनातला खेळाडू जिवंत ठेवणारा हा क्षण असून फलंदाजी करताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह म्हणजे केवळ खेळाचा आनंद नव्हे, तर आयुष्यातील छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधण्याची सुंदर झलक होती




