साताऱ्यात आंदोलनापूर्वीच वन अधिकारी पळाले सिमेंटच्या जंगलात…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) साताऱ्यात आंदोलनापूर्वीच वन अधिकारी पळाले सिमेंटच्या जंगलात…

सातारा दि: उन्हाची तीव्रता वाढत असून गायरान तेथे वनवा अशी अवस्था आहे. तरी त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या साताऱ्यातील वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आक्रमक रित्या आंदोलन केले. या आंदोलनाचा धसका घेऊन वनाधिकारीच सिमेंटच्या जंगलात पळाल्याची चर्चा साताऱ्यात सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे हिस्त्र वन्य प्राणी जिरबंद केल्यानंतर त्याला पिंजऱ्यात कुलूप लावून ठेवतात. पण, साताऱ्यात आंदोलनाच्या वेळेला वनविभागाच्या कार्यालयाचा प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ आली. याबाबत माहिती अशी की, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते संजय गाडे, विशाल कांबळे, रेखा सकटे, सुहास मोरे, अनिल धोत्रे, आशुतोष वाघमोडे ,रोहिणी माने, चंदा कांबळे, प्रतीक गाडे, प्रथमेश भंडारे यांच्यासह वनविभागाच्या कारभाराला कंटाळलेले ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनाचा इशारा दिला होता. लोकशाही मार्गाने राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई, महाराष्ट्र नेते चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे आंदोलक ज्यावेळेला वनविभागाच्या कार्यालयात धडकले. त्यावेळेला कार्यालयाचा दरवाजा बंद असल्याचे पाहून आज सार्वजनिक सुट्टी आहे का? असा प्रश्न कार्यकर्ते एकमेकांना विचारू लागले. परंतु, आज कोणत्याही प्रकारची सुट्टी नसताना शासकीय वेळेत चक्क वनविभागाच्या कार्यालय मुख्य दरवाजा बंद करण्यात आला होता. म्हणजे एका अर्थाने शासकीय कामातच जाणीवपूर्वक अडथळा करणे. ही बाब निश्चितच वनविभागासाठी क्लेशदायक आहे. वनविभागाच्या नियमाप्रमाणे बेकायदेशीर वृक्षतोड रोखणे व वनक्षेत्रामध्ये वनवा लावणे हा प्रकार समाज विघातक असून यावर निर्बंध घालण्यासाठी वन विभागाच्या कार्यालयात पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. त्या कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून तक्रार दाखल केली. सोबत पुरावे ही जोडले. त्यांचे कौतुक करण्यापेक्षा त्यांनी हे जे काम केले ते न करता त्यांनी आमच्यासारखे हप्तेबाजी करावी. असाच प्रकार वनविभागाने केला होता. याबाबत जाब विचारण्यासाठी भर उन्हात वनभवन कार्यालयात आंदोलन झाले . या आंदोलनातून पळ काढून उपवनसंरक्षक अमोल सातपुते हे अक्षरशा सिमेंटच्या जंगलात पळून गेले. अशी माहिती आंदोलकांना मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक ते जर निस्वार्थी व निर्भीड असते तर त्यांनी लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनाला सामोरे गेले असते. त्यांचं मन त्यांना खाऊ लागल्यामुळे त्यांनी पळ काढला. यावेळी त्यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. सदर प्रकारामुळे खऱ्या अर्थाने कुंपणच शेत खात असल्याची बाब उघडकीस आली आहे. आता याबाबत सातारकर जनतेने लूट थांबून या पळकुट्या उपवनसंरक्षक अधिकाऱ्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या दिवशी सकारात्मक दृष्ट्या कारवाई व्हावी अपेक्षा आहे. अन्यथा याच दिवशी वनमंत्री व वन अधिकाऱ्यांच्या प्रतिमेचे दहन करून तीव्र निषेध नोंदवला जाईल. अशी माहिती आंदोलकांनी दिली. सध्या ग्रीन झोन, बफर झोन मधून झाडांची खुलेआम कत्तल होत आहे. तस्करी होत आहे. जावळी तालुक्यातील मावशी येथील वृक्षतोड ही वनविभागाच्याच कृपेने झालेली आहे. याबाबतच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर आंदोलकांना वनविभागाच्या कार्यालयात लोकशाही मार्गाने नम्रपणाने आंदोलन करावे लागले आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, गणेश भिसे, विशाल कांबळे यांनीच शासकीय वेळेत शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात भविष्यात गुन्हा दाखल करण्यासाठी उचली कराव्या लागतील असाही इशारा दिला आहे. या वेळेला संबंधित अधिकाऱ्याच्या प्रतिभेला चपल्याचा हार घालून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यालाच लक्ष केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे संपर्क होऊ शकला नाही.
2) कोरेगावात शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजाभाऊ बर्गे समर्थकांची जोरदार तयारी….

(अजित जगताप). कोरेगाव दि: तीन तालुक्याचा विस्तार असलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर कोरेगावचे अभ्यासू राजकारणी राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या जोरदार शक्ती प्रदर्शनाने भविष्यात कोरेगावचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून आतापासूनच त्यांच्या कामकाजाला सुरुवात झाल्याचे मानण्यात येत आहे. मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. विधानसभेच्या निवडणुकीतही प्रचारासाठी ते आले होते. कोरेगाव शहरातील विकासकामे प्रलंबित न राहता ती तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी आणखी निधी देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील गांधी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत दिली. तसेच राजाभाऊ बर्गे यांच्याशी व्यासपीठावरच संवाद साधला. या वेळेला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, संपर्कप्रमुख शरद कणसे, आमदार बाबर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी विकासकामांसाठी पुढाकार घ्यावा, त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी परिश्रम घ्यावेत. त्यांचा निश्चितच पक्ष विचार करेल. असेही उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले . त्यामुळे २०२९ साली होणाऱ्या कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आतापासून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. सातारा कोरेगाव व खटाव तालुक्यातील कोरेगाव मतदार संघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. दरबार हॉटेलच्या माध्यमातून गुणवत्ता व आपलेपणा यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली असून शिवसेना वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
सातारच्या गांधी मैदानावर सोमवारी रात्री झालेल्या जाहीर सभेत प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी जाहीररीच्या मी माझ्या जीवावर निवडून येतो असे सांगून शिवसेनेच्या नेत्यांना डिवचले आहे. त्यामुळे कोरेगाव मतदार संघातील शिवसैनिक आता सह व्याज परतफेड करण्यासाठी आतापासूनच कामाला लागले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख हनुमंतराव जगदाळे, संपर्कप्रमुख शरद कणसे व मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. श्री बर्गे यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार महेश शिंदे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. आता श्री बर्गे हे अधिकृत शिवसैनिक झालेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोरेगाव शहरासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. एक प्रकारे त्यांना ताकद देण्याचा शुभारंभ करण्यात आला.
विकासकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. नगर विकास मंत्रालयाबरोबरच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही कोरेगाव शहरासाठी जास्तीत जास्त निधी दिला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच, राजाभाऊ बर्गे यांनी प्रभागनिहाय विकासकामांचे प्रस्ताव तयार करून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सादर करावेत. ते प्रस्ताव माझ्याकडे पाठवा, मी त्यांना तत्काळ मंजुरी देईन, असेही त्यांनी नमूद केले.
महायुती सरकारच्या कार्यकाळात कोरेगाव शहराचा विकासाभिमुख कायापालट झाला आहे . याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. मी रडणारा नव्हे तर लढणारा शिवसैनिक आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने दिलेली जबाबदारी समर्थपणाने पार पाडण्यासाठी श्री राजाभाऊ बर्गे आतापासूनच कामाला लागले असून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वाढवण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील. असा विश्वास नव्या व जुन्या शिवसैनिकांना वाटू लागलेला आहे. सध्या ठेकेदारांच्या गराड्यात लोकप्रतिनिधी असल्यामुळे कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत नव्याचर्याला मतदार संधी देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
3) साताऱ्यात जि.प.व्हिप बाबत खेळीमेळीत सुनावणी…

(अजित जगताप)
सातारा दि: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हिप झुगारून तीन सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. यावेळी मोठा संघर्ष झाला होता. या विरोधात राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती .या तक्रारीची पहिली सुनावणी बुधवार दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर घटना नंतर तब्बल एक महिन्याने पुन्हा एकदा त्या तीन सदस्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या दिनांक २० मार्च रोजी दुपारी निवडणुक होती. यावेळी झालेले अपहरण नाट्य ताजे असताना राष्ट्रवादीचे तीन सदस्य कामेश कांबळे ,लता कर्णे व ऋतुजा जगताप हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येऊन सुद्धा त्यांनी निष्ठापूर्वक भाजपला अपेक्षित मतदान केले. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले यांनी संबंधित सदस्यांना अपात्र करण्याची लेखी तक्रार सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या वेळेला तीन सदस्य व तक्रारदार श्री. कबुले यांच्यासोबत कायद्याचा अभ्यास असणारी वकील मंडळी व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनमध्ये अनेक पत्रकार गारव्याचा आस्वाद घेत होते. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीला तीन सदस्यांना दालनात बोलून घेतले. त्यांना पारदर्शक कायद्याप्रमाणे दि. २९ एप्रिल रोजी आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेला विलंब लागू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वकील अँड .दत्तात्रय घोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिप सुनावनी प्रक्रिया ९० दिवसाच्या आत पूर्ण करावी असा विनंती अर्ज दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संदर्भात झालेल्या या घटनेची सुनावणी तारीख पे तारीख न होता ती लवकर व्हावी. अशी राजकीय कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. विलंबाने मिळालेला न्याय हा सुद्धा अन्याय असतो. अशी चर्चा रंगू लागलेली आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुनावणी झाल्यामुळे राजकीय पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून सुनावणीला उपस्थित असलेल्या सर्व सातारा जिल्हा परिषद सदस्य व वकील मंडळी आणि त्यांच्या समर्थकांनी चहापान घेतला. आणि वातावरणातील कडक उन्हाळा थोडा थंड करण्यात यश मिळवले. सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाज पाहताना सातारा जिल्ह्याचा विकास हा महत्त्वाचा आहे. यामध्ये राजकारण आणू नये. असा संदेश बहुदा उपस्थित दोन्ही पक्षातील जिल्हा परिषद सदस्यांनी दिला आहे. अशी चर्चा रंगू लागलेली आहे. व्हिप डावल्यामुळेच काही सदस्यांना जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळालेली आहे त्या संधीचे त्यांनी सोनं करावं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. . ….. ……… ……………




