माळेवाडी:-खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निधीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सांस्कृतिक भवनासाठी २० लाखांचा निधी मंजूर.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

माळेवाडी:-खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निधीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सांस्कृतिक भवनासाठी २० लाखांचा निधी मंजूर.

माळेवाडी ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) हरेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा भाऊसाहेब वाकचौरे यांच्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निर्णयामुळे हरेगाव परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून गावाच्या सांस्कृतिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे या निधीसाठी दि . ५ जुलै २०२६ रोजी मा . आमदार तथा लोकनेते भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनेते भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते नीरज मुरकुटे यांच्या सहकार्याने लोकनियुक्त सरपंच दीपक नवगिरे सामाजिक कार्यकर्ते गणेश छल्लारे व राहुल वाघ यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध विकासकामांचे निवेदन सादर केले होते निवेदनाची तात्काळ दखल घेत खासदार वाकचौरे यांनी ग्रामपंचायतीचा ठराव सादर करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार मा सरपंच दिलीप त्रिभूवन मा . सरपंच रमेश भालेराव तसेच ग्रामविकास अधिकारी घुमणे भाऊसाहेब यांनी आवश्यक प्रस्ताव तयार करून विशेष सहकार्य केले . त्यांच्या प्रयत्नांमुळे सांस्कृतिक भवनाच्या कामासाठी निधी मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला
या विकासकामासाठी सुर्यकांत चाबुकस्वार , रसूल पठाण ‘ विठ्ठल समोसे ‘ अशोक बोधक , सुनील पवार ‘ बाळासाहेब त्रिभूवन ‘ नाना खरात , नरवडे दादा , जनार्दन दुशिंग , गुलाब पठारे ‘ अशोक बनकर , समाधान वाहूल , सुनील ओहळ , शंकर जाधव , आकाश सुर्यवंशी , भारत गायकवाड , विशाल गायकवाड , राहुल पंडित , मिलिंद मोरे काशिनाथ जगताप , व्हसाले गुरुजी , यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी निवेदनातील उर्वरित विकासकामेही लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले . या निधी मंजुरीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत खासदार वाकचौरे यांचे आभार मानले.अशी माहिती लोकनियुक्त सरपंच दीपक नवगिरे यांनी दिली.




