पुणे:-“पुण्याचे डॉ.देवेंद्र साठे (पी टी)यांना ‘श्री काशी ज्योतिष विभूति’ सन्मान”
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“पुण्याचे डॉ.साठे यांना ‘श्री काशी ज्योतिष विभूति’ सन्मान”

पुणे येथील प्रख्यात ज्योतिषतज्ज्ञ डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे( पी. टी.)यांना भारतीय वैदिक ज्योतिष संस्थानम्, वाराणसी यांच्या वतीने “श्री काशी ज्योतिष विभूति” या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
हा सन्मान १२ एप्रिल २०२६ रोजी कामाख्या (आसाम) येथे आयोजित एकादश अखिल भारतीय ज्योतिष संमेलन व दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात आला.
श्री साठे यांनी शास्त्रीय ज्योतिष क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या संशोधनपर कार्यामुळे तसेच ज्योतिष परंपरेच्या जतन आणि प्रसारासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना देशपातळीवर गौरविण्यात आले आहे.
या सन्मानामुळे पुण्याच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून सर्व स्तरांतून श्री साठे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




