आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागठाणे:-(सातारा)-लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये मानसी महेश मोहिते हिची झेप; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी निवड झाल्याने कराटे क्लासमध्ये जल्लोष.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये मानसी महेश मोहिते हिची झेप; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी निवड झाल्याने कराटे क्लासमध्ये जल्लोष.

 तालुका प्रतिनिधी महेश मोहिते

सातारा नागठाणे परिसरातील कु.मानसी महेश मोहिते हिने आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्राविण्य मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाची दखल घेत २६ एप्रिल २०२६ रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी तिची निवड झाल्याने सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या अभिमानास्पद कामगिरीनिमित्त तिच्या कराटे क्लासमध्ये विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्लासमधील सर्व प्रशिक्षक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मानसीचे फुलांचा गुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
मानसीच्या या यशामागे तिचे सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व कुटुंबीयांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. आगामी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेसाठी तिचे शिक्षक सेन्साई श्री.रवींद्र ताटे सर, सेन्साई श्री.नितीन सुरवशेसर, सेन्साई राज्य सचिव श्री.अक्षय साळुंखे सर, सिहान राज्य अध्यक्ष.श्री अविनाश गोंधळी सर, तसेच श्री व्हेंचर शतोकान कराटे असो.महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकारी व सेन्साई कुं.श्रेया साळुंखे (सिनियर ब्लॅक बेल्ट Ist दान राज्य रेफ्री), कु.प्रतिक्षा साळुंखे (ब्लॅक बेल्ट Ist दान), कु.तन्वीर पट्टनकुडे (ब्लॅक बेल्ट Ist दान) कु.जान्हवी गुरव (ब्लॅक बेल्ट Ist), पीयुष साळुंखे, श्रीराज गुरव व सर्व विद्यार्थ्यांनी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व तिचे अभिनंदन केले असून, ती निश्चितच देशाचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button