आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई:-(खडवली)-जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-(खडवली)-जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

मुंबई (शांताराम गुडेकर )
जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या संस्थपिका सौ.कविता शिकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी सागर सर यांनी खडवली येथील जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या १५ वा वर्धापन दिन सोहळा संस्थेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात आणि दिमाखदारपणे पार पडला.या निमित्ताने महाविद्यालयात विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा.दिनेश घरत यांनी केले वर्धापन दिनाच्या सोहळ्याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या सौ .प्रियांका भोईर ,सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बेहरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून डॉ .बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले.या वेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत हे इयत्ता अकरावी आणि बारावीच्या कु.वैष्णवी पाटील, कु .शारदा वाघ,कु .जयश्री ,कु.लहांनगे,कांचन भालेराव यांनी स्वागत गीताने केले.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.एस.जी.सागर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या गेल्या १५ वर्षांतील संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन महाविद्यालयाने एक वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. तसेच आगामी काळात सुरू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमांबद्दलही त्यांनी माहिती दिली.


त्यानंतर उप- प्राचार्य प्रा .प्रशांत तांदळे यांनी प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या कु. वैष्णवी पाटील, कु साक्षी शिलके ,कु. जयश्री लहांनगे या विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांची व उपस्थितांची मने जिंकली.या सोहळ्याचे नियोजन प्रा .भावना साबळे, प्रा.सुमित गवारे ,प्रा.प्राची गायकवाड यांनी केले . सदर कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शेवटी प्रा. शेख सर यांच्या आभार प्रदर्शनाने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button