आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-शिरसगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिरसगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

श्रीरामपूर | RPS स्टार न्यूज प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार, दि. २९ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता श्री संत हरिबाबा समाधी अभिषेक, तर १०.३० वाजता श्रीनाथ हवन होणार आहे.
तसेच सकाळी १० ते १२ या वेळेत माणिकनाथ महाराज यांचे संगीत प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. प्रवचनानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, महाप्रसादाचे अन्नदान खंडाळा येथील नगरकर परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे.
या भक्तिमय धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




