आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुसेसावळी:-राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल,पुसेसावळी (थोरवेवाडी) येथे विद्यार्थ्यांची आषाढी दिंडी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुसेसावळी:-राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल,पुसेसावळी (थोरवेवाडी) येथे विद्यार्थ्यांची आषाढी दिंडी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न.


पुसेसावळी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल, पुसेसावळी (थोरवेवाडी) येथे विद्यार्थ्यांची दिनांक 24 जुलै रोजी आषाढी दिंडी अत्यंत भक्तिमय, पारंपरिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “राम कृष्ण हरी” या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
दिंडीची सुरुवात पुसेसावळी येथील दत्त चौकातून करण्यात आली. टाळ, मृदंग, भगव्या पताका आणि हरिनामाच्या गजरात विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने दिंडीत सहभागी झाले. दिंडी ग्रामपंचायत पुसेसावळी येथे पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी अभंग, भारूड, भक्तिगीते, समूहगीत, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वरून राजाकडून किंचित अडचण येऊनही विद्यार्थ्यांनी आपल्या नियोजनात बदल येऊ दिला नाही.
सर्व विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांच्या वेशभूषेत साकारलेले रूप विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड, व्यसनमुक्ती, पाणी बचत, मुलींचे शिक्षण, सामाजिक ऐक्य, राष्ट्रप्रेम आणि मानवतेचा संदेश देणारे फलक हातात घेऊन समाजप्रबोधन केले. जागतिक अस्थिर परिस्थितीमध्ये शांतता व बंधुतेची अपेक्षा करणारा फलक वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच मा. श्री. सुरेशबापू पाटील, विद्यमान सोसायटी चेअरमन श्री. शहाजी पाटील, माजी चेअरमन मा. श्री. रविंद्र कदम, माजी उपसरपंच मा. श्री. अशोक कदम तसेच विद्यमान सरपंच मा. श्री. नामदेव माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि सामाजिक संदेशांचे मनापासून कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होतो, असे मत व्यक्त केले.
यावेळी शाळेचे प्राचार्य क्षीरसागर सर, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. आषाढी दिंडीच्या माध्यमातून “भक्तीबरोबरच समाजसेवा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि चांगले संस्कार हीच खरी जीवनाची वाट” हा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविला. हा उपक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला आणि सर्व स्तरातून त्याचे भरभरून कौतुक करण्यात आले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button