कराड:-दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; कराडमध्ये आदिशक्ती महासंघाचे लाक्षणिक उपोषण यशस्वी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; कराडमध्ये आदिशक्ती महासंघाचे लाक्षणिक उपोषण यशस्वी.

कराड : -देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या समर्थनार्थ आदिशक्ती महासंघाच्या वतीने २४ जुलै रोजी कराड येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व आंदोलन आयोजित करण्यात आले. कराड परिसरातील विद्यार्थी, नागरिक आणि विविध स्तरातील मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे आंदोलन शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि यशस्वी वातावरणात पार पडले.
आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत कराडच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व उपोषणाची सांगता केली. विद्यार्थ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आंदोलनाच्या प्रारंभापासून ते समाप्तीपर्यंत कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) श्री. दराडे आणि संपूर्ण कराड पोलीस प्रशासन यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे आंदोलन अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. याबद्दल आदिशक्ती महासंघाने पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी आदिशक्ती महासंघाच्या अध्यक्षा अश्विनीताई वेताळ-पाटील, राज्य कार्याध्यक्ष कृपा हादवे, सविता काशिद यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारे हे कराडमधील आंदोलन विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक ठरले.




